iQOO 11 Series Launch Saam Tv
लाईफस्टाईल

iQOO 11 Series Launch : Vivo चा तगडा स्मार्ट फोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नुकताच भारतामध्ये येत्या १० जानेवारीला IQOO ची सिरीज लाँच होणार आहे.

कोमल दामुद्रे

iQOO 11 Series Launch : स्मार्टफोन म्हटलं की, आपल्या प्रत्येकाला त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घेण्यात रस असतो. नुकताच भारतामध्ये येत्या १० जानेवारीला IQOO ची सिरीज लाँच होणार आहे.

या सिरीजमध्ये आपल्याला नवीन फीचर्स मिळणार आहे. ज्यामध्ये IQOO 11 5G आणि 11 pro 5G या दोन स्मार्टफोनची सिरीज असणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होताच मार्केटमध्ये तुफान गाजवणार आहे. हे दोन्हीही स्मार्टफोन नवीन आणि धमाकेदार फीचर्स सोबत मार्केटमध्ये येत आहेत.

त्याचबोबर असं ही सांगितलं जातयं की, आतापर्यंतचा मार्केटमधला हा सर्वात जास्त फीचर्स असलेला आणि जास्तीतजास्त प्रमाणात फास्ट काम करणारा हा पहिला फोन असेल. IQOO सिरीज चे स्पेसिफिकेशन्सही दमदार असणार आहे. आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनची खासियत सांगणार आहोत.

या फोनमध्ये युजर्ससाठी अतिशय स्मूथ स्क्रीन असणार आहे. ज्यामध्ये ६.७८ इंचची E6 एमॉडेल डिस्प्ले दिली जाऊ शकते. जी 144hzच्या रिफ्रेश रेटसोबत येइल अशी शक्यता आहे. अशातच या फोनमधील काही फीचर्स IQOO 10 5G सारखे असतील. कारण, IQOO 11 5G हा IQOO 10 5G च्या सक्सेसरच्या रुपात लाँच केला जाणारं आहे. माहितीनुसार हा स्मार्टफोन 2023 मध्ये भारतात लॉन्च होईल अशी शक्यता दर्शवली जाते. अशातच हा स्मार्टफोन अतिशय वेगवान गतीने काम करणार आहे.

या फोनच्या डिवाइजमध्ये तुम्हाला 12GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज दिले जाणारं आहे आणि त्याबरोबरचं LPDDR5X RAM आणि UFS 4.0 एवढं स्टोरेज ऑफर केलं जाऊ शकतं.

फीचर्स -

कॅमेरा आणि बॅटरी विषयी बोलायचं झाले तर, तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये 13 MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा, 50 MP चा मुख्य कॅमेरा आणि 8 MP चा मायक्रो सेंसर सुद्धा असेल. त्याचबरोबर सेल्फीप्रेमींसाठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. IQOO च्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh एवढी बॅटरी आणि या बॅटरीला रिचार्ज करण्यासाठी 120W चा फास्ट चार्जर देखिल मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT