लाईफस्टाईल

International Womens Day: महिलांना होणारे सगळ्यात गंभीर आजार कोणते? जाणून घ्या सविस्तर

Womens Health Issues: महिला म्हटलं की आजारपण आहेच. सध्याच्या युगात महिला चुल आणि मुल इतकीच कामे न करता जागतिक पातळीवर सुद्धा कामाचा हातभार लावत आहेत.

Saam Tv

महिला म्हटलं की आजारपण आहेच. सध्याच्या युगात महिला चुल आणि मुल इतकीच कामे न करता जागतिक पातळीवर सुद्धा कामाचा हातभार लावत आहेत. घराबरोबर त्या त्यांच्या इच्छेनुसार विविध पोस्टवर सुद्धा काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशातच त्यांच्या होणाऱ्या धावपळीत तब्येती अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना अनेक शारिरीक समस्यांना सतत सामोरं जावं लागतं. याचं एक कारण म्हणजे, त्या पुरुषांपेक्षा अधिक कामे करत असतात.

महिलांना रोजच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यात त्यांची इम्यूनिटी कमजोर होणं, कॅलशियमची कमतरता, योग्य आहार न वेळेवर न घेणं, अपचन यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या सामान्य वाटणाऱ्या समस्या हळूहळू वाढतं जातात आणि गंभीर रुप धारण करतात. याचं बद्दल आम्ही तुम्हाला पुढील माहिती सांगणार आहोत. जेणे करून त्यापासून तुम्ही वेळीच सावध व्हाल.

१. ब्रेस्ट कॅन्सर

महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर हा आजार अगदी कॉमन झाला आहे. भारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. हा आजार थेट महिलांच्या मृत्युचं सुद्धा कारण बनत आहे. यापासून लांब राहण्यासाठी तुम्ही योग्य आणि हेल्दी डाएट फॉलो केले पाहिजे. तसेच कोणत्याही धुम्रपानाच्या आहारी जावू नये.

२. सर्व्हायकल कॅन्सर

भारतात सर्वाधिक रुग्ण सर्व्हायकल कॅन्सरचे आहेत. याची संख्या कमी न होता वाढत चालली आहे. हा कॅन्सर महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणून सुद्धा ओळखला जातो. यापासून लांब राहण्यासाठी तुम्ही एचपीवी वॅक्सीन घेऊ शकता. तसेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताच उपचार करू नये. हा फार नाजूकपणे हातळ्यासारखा विषय आहे.

३. गर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाचा कॅन्सर हा आजार महिलांसाठी फार गंभीर आजार आहे. यात मासिक पाळीच्या वेळेस जास्त ब्लीडींग, मेनोपॉजनंतरही रक्तस्त्राव अशा समस्या उद्भवतात. यासाठी नियमित एक्सरसाइज आणि आहार घेणं फार महत्वाचं आहे.

४. डायबिटीज

डायबिटीज हा आजार तुलनेनं पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात जाणवतो. याचा परिणाम तुमच्या संपुर्ण शरीरावर जाणवतो. हा आजार एक सायलेंट कीलर आहे असे आपण म्हणू शकतो. यापासून लांब राहण्यासाठी तुमच्या आहारावर नियंत्रण असणं महत्वाचं आहे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

SCROLL FOR NEXT