International Friendship Day 2023 Saam tv
लाईफस्टाईल

International Friendship Day 2023: तेरा यार हू में..., फ्रेंडशिप डे कधी आहे? जाणून घ्या

Friendship Day Celebration : मैत्री ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर व प्रेमळ नातं.

कोमल दामुद्रे

Friendship Day Date : मैत्री ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर व प्रेमळ नातं. मैत्रीला कोणातच रंग, बंध, आकार, जात-धर्म नसते. ते सहज व सोप्या पद्धतीने विणलं जाणार नातं. या नात्यात कुठलेच हेवेदावे नसतात असते ती निखळं मैत्री.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीसाठी एक विशिष्ट जागा असते. अगदी बालवयापासून ते वयोवृद्धापर्यंत चिरतरुण राहणार नातं म्हणजे मैत्री. आयुष्याच्या अनेक कठीण प्रसंगात मित्र हा खंबीरपणे आपल्या मागे उभा राहातो. चुकल्यावर ओरडायला व चिडल्यावर हक्क दाखवणारा मित्र हा आयुष्यात प्रत्येकाला हवा असतो. यंदा जागतिक मैत्री दिन कधी साजरा केला जाणार आहे हे जाणून घेऊया.

1. पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?

मित्रांच्या मार्फत शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी संस्था वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने आंतरराष्ट्रीय मैत्री (Friends) दिनाचा प्रस्ताव मांडला होता.त्यासाठी फ्रेंडशिप डे दरवर्षी ३० जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९५८ साली साजरा (Celebrate) करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०११ मध्ये अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मैत्री (Friendship) दिवस घोषित केला.

2. भारतात कधी साजरा केला जातो?

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्री दिनाच्या नावावर आहे. हा दिवस फ्रेडशिप डे म्हणून भारतभर साजरा केला जातो. यंदा हा दिवस ६ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.

ऑगस्टमधील पहिला रविवार हा भारताशिवाय इतर अनेक राष्ट्रांमध्ये फ्रेडशिप डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसडेच्या प्रस्तावापूर्वीच पहिल्या-वहिल्या फ्रेंडशिप डेची कल्पना आली. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय मैत्री दिन जागतिक शांतता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी योगदान देऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT