
Friendship Day : असे म्हटले जाते की, कोणतीही गोष्ट करताना ती विचारपूर्वक करावी पण मैत्री करताना कोणाताही विचार आपण करत नाही. ती अगदी सहज सोप्या पद्धतीने होते. जन्माने आपल्याला अनेक नाती मिळतात पण मैत्री हे असे नाते आहे की, ते आपण स्वत: तयार करतो. त्यात रुसवे-फुगवे, भांडण- प्रेम सगळ्या भावना एकवटलेल्या असतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, मित्र असावा तर श्रीकृष्ण व सुदामासारखा. कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देणारा. आपली चांगली वाईट चुक सांभाळून घेणारा. परंतु, कधीतरी आयुष्यात मित्राची परीक्षा घेणे देखील गरजेचे असते. मित्र टिकवायची असेल व ती अधिक फुलवायची असेल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे असते. चाणक्यांनी मित्र निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
1. गोड बोलणारा
अशा मित्रांपासून (Friendship) दूर राहा जे तुमच्या समोर गोड बोलतील आणि मागून तुमच्या वाईट बोलतील. असे लोक कधीच कोणाचे नसतात. खरा मित्र तोच जो तुमच्या अनेक चुका तोंडावर सांगण्याची हिंमत करेल. तुमच्या बद्दल वाईट ऐकून घेणार नाही.
2. वायफळ बडबडणारे
गॉसिप करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. गंमतीसाठी किंवा मज्जा करण्यासाठी अनेक लोकांच्या गोष्टी येऊन सांगणारे मित्र जवळ ठेवूच नका. असे लोक अधिक घातक असतात.
3. गरज असताना तिथे नसणे
मित्राची खरी ओळख ही संकटाच्या वेळीच होते. सुखाच्या काळात सर्वजण तुमच्या पाठीशी उभे असतात, यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या गरजेच्या वेळी (Time) एखादा मित्र तुमच्या सोबत नसेल तर तुम्हाला साथ न देण्यामागे कोणतेही कारण देत असेल, तर तुम्ही त्याच्याशी असलेली मैत्री संपवण्याचे हे लक्षण आहे.
4. विरुद्ध स्वभावाच्या लोकांशी मैत्री
ज्याप्रमाणे साप-मुंगूस, शेळी-वाघ, हत्ती-मुंगी, सिंह-कुत्रा हे मित्र असू शकत नाहीत, त्याचप्रमाणे विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीपासूनही दूर राहावे, असे अर्चाय चाणक्यही सांगतात. जरी अशी व्यक्ती तुमच्याशी मैत्री आहे असे बोलत असेल तरी त्याच्या स्वभावानुसार तो एक दिवस नक्कीच बदलेल. त्यामुळे वेळीच दूर राहा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.