Debit Card Secret Tips  Saam tv
लाईफस्टाईल

Debit Card Secret Tips : डेबिट कार्डबद्दल या 3 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहितेय का?

3 Secret Tips For Debit Card : आपण या कार्डमुळे कुठेही, कधीही, केव्हाही आपल्या गरजेनुसार रक्कम काढू शकतो, तसेच पाठवू देखील शकतो.

कोमल दामुद्रे

Debit Card Hacks : आपण बँकेत खाते उघडल्यानंतर बँकेकडून आपल्याला काही काही सुविधा पुरवल्या जातात. त्यातील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे डेबिट कार्ड. आपण या कार्डमुळे कुठेही, कधीही, केव्हाही आपल्या गरजेनुसार रक्कम काढू शकतो, तसेच पाठवू देखील शकतो.

सध्याच्या UPI पेमेंटच्या काळात डेबिट कार्डला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. तुम्हाला जर UPI वापरायचे असेल तर त्याकरिता तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला UPI पेमेंट करता येणार नाही. तेव्हा या अतिशय महत्त्वपूर्ण कार्डबद्दल या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. काय आहेत त्या 3 गोष्टी पाहूयात.

1. डेबिट कार्डच्या कालबाह्यतेचा कालावधी 5 वर्षांचाच का असतो ?

आपण आपले डेबिट कार्ड (Debit card) कधी निरखून पाहिले असेल तर, त्यावर हल्ली एक छोटी चिप बसवलेली पाहायला मिळते. खरंतर त्या चिपमध्ये तुमची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांच्या काळात ती चिप खराब होते आणि रिड होऊ शकत नाही. म्हणून याचा कालबाह्य काळ ५ वर्षांचाच असतो.

2. डेबिट कार्डला चिप का लावलेली असते?

पूर्वी डेबिट कार्डवर तुमची सर्व माहिती मॅग्नेटिक स्किप/ मॅक्स स्किपमध्ये असायची परंतु, हॅकर्स त्यामधून खूप सहजपणे सर्व माहिती मिळवायचे त्यामुळे या कारणामुळे अॅडिशनल सेक्युरीटी म्हणून ही चिप बसवण्यात आली आहे.

3. कार्डवरील CVV काय असतो?

तुम्ही जेव्हाही ऑनलाईन (Online) खरेदी करता तेव्हा, पेमेंट करताना तुम्हाला कार्ड डिटेल्समध्ये कार्ड नंबर सोबत CVV विचारला जातो. असे का? कारण, जेव्हा ऑनलाईन खरेदी केली जाते तेव्हा तुमचा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड नंबर वेबसाइटवर स्टोअर्ड असतो आणि जर का ती वेबसाइट हॅक झाली तर तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्ड नंबर वरून तुमची सर्व माहिती हॅकर पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे जरी हॅकरकडे तुमचा कार्डनंबर गेला तरी CVV तुमच्याकडेच राहतो. CVV कोणत्याही वेबसाइटवर स्टोअर होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT