Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपयांत मिळवा 2 लाखांचा फायदा; या सरकारी योजनेसाठी असा करा अर्ज

PMSBY Scheme (सरकारची प्रधानमंत्री विमा योजना) : प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आणि कुटुंबियाना जवळच्या व्यक्तीला नेहमी सुरक्षित, आनंदी पाहायचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

What Is Suraksha Bima Yojana :

प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आणि कुटुंबियाना जवळच्या व्यक्तीला नेहमी सुरक्षित, आनंदी पाहायचे असते. परंतु कधीकधी असे अपघात घडतात की, ज्याने आपल्या कुटुंबियाना हानी पोहचते. या काळात सर्वांवरच वाईट परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री विमा योजना उपयुक्त ठरते. आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री विमा योजनेबद्दल सांगणार आहोत.

सरकारची प्रधानमंत्री विमा योजना ही योजना (Scheme) खूप उपयुक्त आहे. ही योजना खूप स्वस्त आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला वार्षिक फक्त 20 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुम्हाला २ लाखांचे अपघात विमा संरक्षण मिळेल. अपघाताच्या वेळी तुम्हाला २ लाख रुपयांच्या विम्याअंतर्गत आर्थिक मदत मिळेल.

पीएम सुरक्षा विमा योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री विमा (Policy) योजना ही सरकारची योजना आहे. जी अपघात किंवा अडचणीच्या वेळी कामी येईल. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला अपघाताच्या वेळी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देईल. 8 मे रोजी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत अर्जदारांनी अपघाताच्या 30 दिवसांच्या आत अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर 60 दिवसांच्या आत त्यावर काम केले जाईल.

ही योजना 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. याअंतर्गत, तुमच्या बँक खात्यातून वर्षाला 20 रुपये ऑटो-डेबिट केले जातील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यात प्रीमियम कपातीइतकी रक्कम शिल्लक ठेवावी, अन्यथा तुमची पॉलिसी बंद केली जाऊ शकतील.

या योजनेअंतर्गत तुमचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा तुम्ही पूर्णपणे अपंग झाल्यास 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. जर तुम्ही काही प्रमाणात जखमी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयांची मदत मिळेल.

अर्ज कसा भरायचा?

आजकाल सर्व काही ऑनलाईन (Online) होत आहे. तुम्ही ऑनलाइन अर्ज करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही बँक अर्ज उघडतानाही विमा संरक्षणासाठी अर्ज करु शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जा. विमा विभागावर क्लिक करा. विमाचा पर्याय निवडा. यानंतर सर्व माहिती भरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT