Weight Loss Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

Weight Loss Diet : ज्वारीची भाकरी किंवा पोळी आरोग्यासाठी उत्तम. यामध्ये देखील कॅल्शिअम जास्त असते. शिवाय ही भाकरी बनवताना तेलाचाही वापर केला जात नाही.

Ruchika Jadhav

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध टिप्स फॉलो करतात. कोणी जिम जॉईन करतं तर कोणी घरीच व्यायाम करतात. तसेच आहारात देखील बराच बदल करतात. अनेक महिला बेली फॅट कमी व्हावं यासाठी चपाती खात नाहीत. चपाती खाल्ल्याने वजन वाढतं असा काहींचा समजत आहे. आता तुम्ही देखील चपाती खात नसाल तर तुमच्यासाठी अन्य काही पिठाच्या पोळ्या जाणून घेऊ.

राजगिरा

राजगिरा पाचण्यासाठी फार हलका असतो. त्यामुळे राजगिराची भाकरी उत्तम लागते. यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन देखील असतं. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने ही भाकरी किंवा पोळी खाल्ल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होईल. त्यामुळे तुम्ही चपाती ऐवजी राजगिरा पोळी खाऊ शकता.

ज्वारी

ज्वारी शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात खावी. ज्वारी थंड असते, जास्त गरम नसते. त्यामुळे ज्वारीची भाकरी किंवा पोळी आरोग्यासाठी उत्तम. यामध्ये देखील कॅल्शिअम जास्त असते. शिवाय ही भाकरी बनवताना तेलाचाही वापर केला जात नाही. त्यामुळे ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता.

बाजरी

बाजरी शक्यतो थंडीच्या दिवसांत खावी. बाजरी गरम असते त्यामुळे ती गर्मीच्या दिवसांत खाऊ नये. थंडीमध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही चपाती ऐवजी बाजरीची भाकरी खाऊ शकता.

नाचणी

नाचणीमध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामुळे आहारात नचणीचा समावेश करावा. नाचणी पचण्यासाठी सुद्धा हलकी असते. नाचणीचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करत असाल आणि गव्हाच्या तसेच मैद्याच्या चपात्या खात नसाल तर या पिठापासून बनलेल्या चपात्या किंवा भाकरी तुम्ही आवश्य खाव्यात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: आरक्षण जीआरमुळे भुजबळ नाराज, मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Maharashtra Live News Update: गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT