vitamin deficiency sleep  google
लाईफस्टाईल

Insomnia Vitamins: 'रात को नींद आती नहीं', नुसती कुस बदलता? 'या' ५ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

Vitamin Deficiency: रात्री नीट झोप लागत नाही, मधेच जाग येतेय किंवा सकाळी थकवा जाणवतोय? हे तुमच्या शरीरातील पाच महत्त्वाच्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. योग्य पोषणाने झोप सुधारते.

Sakshi Sunil Jadhav

  • रात्री झोप न लागण्यामागे जीवनसत्त्वांची कमतरता मोठे कारण असू शकते.

  • व्हिटॅमिन D, B6, C, सेलेनियम आणि ओमेगा-3 झोपेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

  • त्यांची कमतरता मेलॅटोनिन पातळी बिघडवून झोपेच्या चक्रावर परिणाम करते.

सध्या लोक रात्रंदिवस काम करताना पाहायला मिळतात. यामुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. काहींनी कामानिमित्त झोपेच्या वेळा सुद्धा कमी केल्या आहेत. यामुळे शरीरावर कालांतराने गंभीर परिणाम होतो. मात्र अनेकांना रात्री झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचे मूळ कारण हे तुमच्या शरीरातील जीवनसत्वांची कमतरता आहे. याने तुम्हाला चिडचिडपणा, थकवा, मेंदू काम न करणे, लक्ष केंद्रित न करता येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

रोज रात्री झोप येण्यात अडथळे येणे, मधेच वारंवार जाग येणे किंवा सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणे ही समस्या अनेकांना त्रासदायक ठरते. शरीरातील काही आवश्यक जीवनसत्त्व आणि खनिजं हार्मोन संतुलन, तणाव नियंत्रण, ऊतींची दुरुस्ती आणि झोप जागृती चक्र सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या पोषकद्रव्यांची पातळी कमी झाली तर मेलॅटोनिनचे उत्पादन बिघडते, सूज वाढते किंवा मूड अस्थिर होतो आणि त्याचा थेट परिणाम झोपेवर होतो.

व्हिटॅमिन D ची कमतरता आजकाल सर्वाधिक दिसून येते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि घरातील जास्त वेळ यामुळे शरीरातील व्हिटॅमिन D कमी होते आणि यामुळे झोपेची वेळ, गुणवत्ता आणि ऊर्जा पातळी कमी होऊ शकते. तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता तणाव हार्मोन्स वाढवते आणि जास्त तणावामुळे रात्री झोप लागत नाही. फ्लॅक्ससीड, बदाम, अक्रोड, मासे याचा आहारात समावेश करावा.

सेलेनियमची पातळी कमी असल्यास थकवा, मूड बदल आणि इम्युनिटी कमकुवत होऊ शकते. विशेषतः शाकाहारी व्यक्तींमध्ये हे जास्त दिसते. ब्राझिल नट्स, सनफ्लॉवर सीड्स व संपूर्ण धान्ये यामुळे सेलेनियमची भरपाई करता येते.

त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C कमी असल्यास सूज, इन्फ्लमेशन आणि hormonal imbalance वाढतं. ज्यामुळे झोप बिघडते. व्हिटॅमिन B6 झोप नियंत्रित करणाऱ्या सेरोटोनिन आणि मेलॅटोनिनसाठी आवश्यक असल्यामुळे त्याची कमतरता निद्रानाश, चिडचिड आणि तणाव वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, सतत झोपेच्या तक्रारी जाणवत असतील तर रक्ततपासणी करून या जीवनसत्त्वांची पातळी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य पोषण मिळाल्यास शरीराची झोप जागृती प्रक्रिया नैसर्गिकरीत्या सुधारते आणि गाढ, ताजेतवाने झोप मिळण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chavali Batata Rassa Bhaji Recipe: आचारी स्टाईल चवळी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

कौटुंबिक वाद टोकाला गेला; नवऱ्यानं बायकोला संपवलं, नंतर ट्रेनसमोर उडी मारली, डोंबिवली हादरली

Maharashtra Live News Update: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

Shahrukh Khan: शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट व्हायरल; गणितात मिळाले होते 'इतके' मार्क्स

Kokam Kadhi: कोकण स्पेशल आंबट-गोड कोकम कढी, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT