MG Comet EV Saam TV
लाईफस्टाईल

MG Comet EV Launch: ठरलं! देशातील सर्वात लहान 'इलेक्ट्रिक कार' 26 एप्रिलला होणार लॉन्च, जाणून घ्या किती असेल किंमत

Smallest Electric Car Price in India : देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार MG Comet EV सादर, किंमत आहे...

Satish Kengar

Cheapest Electric Car in India 2023: एमजी मोटरने आपली छोटी इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्ही सादर केली आहे. ही सध्या देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. आपल्या सेगमेंटमधील ही पहिलीच कार आहे.

आता याच्या लॉन्च डेटची माहिती समोर आली आहे. MG Comet EV 26 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणार आहे.

कंपनी याच्या किंमती मे 2023 मध्ये घोषित करू शकते . कंपनीने या ईव्हीचे उत्पादन सुरू केले आहे आणि येत्या महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू होऊ शकते. आतापर्यंत कंपनीने याची रेंज, बॅटरी क्षमता इत्यादींचा खुलासा केलेला नाही. (Latest Auto News in Marathi)

यामध्ये 17.3 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 42 hp पॉवर आणि 110 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारला 10 - 80% चार्ज करण्यासाठी 5 तास आणि 0 - 100% चार्ज करण्यासाठी 7 तास लागतात.

एका चार्जवर 230 किमीची रेंज देऊ शकते, असं बोललं जात आहे. नवीन ईव्ही जीएसईव्ही प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. शहरी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या कारची डिझाइन करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेसाठी या प्लॅटफॉर्मला एक मजबूत स्टील फ्रेम देण्यात आली आहे. ज्यामध्ये 17 हॉट स्टॅम्पिंग पॅनेल देखील उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

MG Comet EV च्या लूकबद्दल बोलायचे झाले तर याला एक लहान फ्रंट ग्रिल, मोठी LED स्ट्रिप, पातळ हेडलाइट्स देण्यात आले आहेत. यात मोठे दरवाजे, स्पोर्टी अलॉय व्हील आणि सपाट मागील भाग आहे. यात बरेच नवीन फीचर्स देण्यात आले आहे. दरम्यान, लॉन्च झाल्यानंतर ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

Railway New Service: दिलासादायक! रेल्वे प्रवासी ताण तणावातून मुक्त होणार, CSMT स्टेशनवर नवी सुविधा सुरू

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

SCROLL FOR NEXT