Upcoming Cng Cars in India 2023 : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपली नवीन Tata Altroz ICNG साठी आजपासून बुकिंग सुरु केली आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि डीलरशिपला भेट देऊन ग्राहक ही कार बुक करू शकता. बुकिंगसाठी तुम्हाला 21,000 रुपये आगाऊ रक्कम भरावी लागेल. याची किंमत येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल.
Tata Altroz ICNG ची डिलिव्हरी मे 2023 पासून सुरू होईल. ही कार चार प्रकारांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे - XE, XM+, XZ आणि XZ+ पर्याय. या कारवार ग्राहकांना तीन वर्षकिंवा 1 लाख किलोमीटरची वॉरंटी मिळेल. (Latest Auto News in Marathi)
Tata Altroz ICNG 1.2-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. परंतु CNG मोडमध्ये ते 77hp पॉवर आणि 97Nm टॉर्क जनरेट करेल.
यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. Altroz थेट CNG मोडमध्ये सुरू करता येते. जे आतापर्यंत कोणत्याही मॉडेलमध्ये पाहायला मिळाले नाही. यामध्ये मोठ्या टाकीऐवजी ड्युअल टँक सेटअप देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
हे दोन्ही 30-30 लिटरचे असतील. Altroz सध्या 345 लीटरच्या बूट स्पेससह येते आणि CNG व्हेरियंटला सुमारे 200 लिटर बूट स्पेस मिळते. कंपनीने बूट स्पेस लक्षात घेऊन हे ट्विन टँक तंत्रज्ञान आणले आहे.
फीचर्स
यात 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले मिळेल. त्याचबरोबर यात व्हॉईस अॅक्टिव्हेटेड सनरूफ, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 16-इंचाचे अलॉय व्हील्स दिले जातील. यासोबतच लेदर सीट्स, रिअर एसी व्हेंट्स आणि फ्रंट सेंटर आर्मरेस्ट यात दिले जाऊ शकतात. ही कार 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते.
अल्ट्रोज ICNG मध्ये लिकेज डिटेक्शन फीचर दिले जाईल. जेणेकरुन ट्विन सीएनजी सिलेंडरमधून गॅस गळतीपासून संरक्षण होईल. Tata Altroz ICNG ची किंमत त्याच्या पेट्रोल प्रकारापेक्षा 90,000 रुपये जास्त असू शकते.
ही सध्या 6.45 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. जी टॉप व्हेरियंटसाठी 9.10 लाखांपर्यंत जाते. Tata Altroz ICNG हे कंपनीचे तिसरे मॉडेल असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.