Mehndi Wedding Tradition Saam TV
लाईफस्टाईल

Mehndi Wedding Tradition: लग्नात नवरा-नवरी हातावर मेहंदी का काढतात? यामागचं खरं कारण काय?

Mehndi Rituals: मेहंदी काढण्याची ही पद्धत वर्षानुवर्षे चालत आली आहे.

Ruchika Jadhav

Indian Wedding:

भारतीय संस्कृतीत विविध पद्धतीने विवाह पार पडतो. सर्व ठिकाणी वेगवेगळ्या रीती असल्यातरी मेहंदी प्रत्येक ठिकाणी सेलिब्रेट केली जाते. आजकाल मेहंदी फंक्शनला नवरा नवरी दोघेही एकत्र येतात आणि उत्साहात आपली मेहंदी साजरी करतात. (Latest Hindu Mehndi Rituals)

लग्नाच्या 2 किंवा 3 दिवस आधी मेहंदी काढली जाते. यामध्ये वधूच्या हातावर काढलेल्या मेहंदीवर वराचे नाव बारीक अक्षरात रेखाटले जाते. नवरदेवाला हे नाव शोधून दाखवायचे असते. यावेळी दोन्ही कुटुंबात हास्यकलोळ उठतो. मेहंदी काढण्याची ही पद्धत वर्षानुवर्षे चालत आली आहे. मेहंदी फक्त शोभेसाठी काढली जात नाही. मेहंदी कढण्यामागे काही वैज्ञानिक करणे देखील आहेत.

वधू आणि वर लग्नाच्या गडबडीत फार दमून जातात. घरातील इतर महिला देखील कामे करून थकलेल्या असतात. अशात मेहंदी फार थंड असते. थंड मेहंदी तुम्ही पायांना आणि हातांना लावल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

मेहंदी काढणे ही प्राचीन भारतातील संस्कृती असल्याचे काही जण सांगतात. तर काही जण ही मुघल आणि इजिप्तमधून आलेली संस्कृती आहे असेही सांगता. मेहंदीला सुख, समृध्दी आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

मेहंदीच्या पानांमध्ये असलेला सुगंध नव जोडप्याला एकमेकांकडे आकर्षित करतो असं म्हणतात. नववधूच्या हातावरील मेहंदीच्या रंगाचे देखील विशेष महत्व आहे. मेहंदी जितका जास्तवेळ टिकेल तिचा रंग जितका जास्त गडद असेल त्यावरून नवरी शुभ पावलांनी आली असं म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Kitchen Hacks : भाज्यांमध्ये तिखटपणा जास्त झाल्यास काय करावे? जाणून घ्या टिप्स

Bharti Singh : "देवाचे आभार की, मला मुलगी नाही", कॉमेडी क्वीन भारती सिंह असं का म्हणाली?

DRDO Internship: फ्रेशर्स आहात? डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT