Indian Railway  Saam Digital
लाईफस्टाईल

Indian Railway Rule : ट्रेनचा प्रवास करताय? ४ महत्वाचे नियम जाणून घ्या; एका छोट्या चुकीने तुरुंगात जाल अन् दंडही भराल

Indian Railway Rule update : ट्रेनचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने काही नियम आखले आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी ४ प्रकारचे नियम आखले आहेत.

Vishal Gangurde

Indian Railway Rule in Marathi : भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करणे हा चांगला पर्याय आहे. देशातील बहुतेक जण दूरचा प्रवास करण्यासाठी सर्वात आधी रेल्वे प्रवासाला पसंती दर्शवतात. ट्रेनने प्रवास करणाऱ्या अनेकांना रेल्वेचे नियम माहीत नसतात. ट्रेनने प्रवास करताना वस्तू, जेवण्याचे नियम आणि धुम्रपानाविषयी काय नियम आहेत, जाणून घेऊयात.

ट्रेनने प्रवास करताना अनेक जण मोजकं सामन घेऊन जातात. तर काही जण बरंच जड सामन घेऊन जाताना दिसतात. ट्रेनने प्रवास करताना काही जण लपून छपून धूम्रपान करताना आढळतात. अशा प्रवाशांमुळे रेल्वेने ट्रेनने प्रवास करताना छोट्या छोट्या बाबींसाठी नियम तयार केले आहेत. काही नियमांचं उल्लघन केल्यास दंड देखील आकारला जाऊ शकतो. तर काही नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.

ट्रेनने किती सामान घेऊन जाण्यास परवानगी आहे?

रेल्वेने प्रवास करताना प्रवासी सामान घेऊन जाऊ शकतो. मात्र, त्यावरही रेल्वेच्या मर्यादा आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, एक प्रवासी ७० किलो वजनापर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो. तर सेकंड एसीमध्ये ५० किलो वजनापर्यंत सामान वस्तू घेऊन जाऊ शकतो. तर थर्ड एसी आणि चेअर कारमध्ये ४० किलो वजनापर्यंत सामान घेऊन जाण्यास परवानगी आहे. तर स्लीपर क्लासमध्ये ४० किलो वजनापर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो.

ध्रूमपानाविषयी आहेत कडक नियम

रेल्वे प्रवासात काही जण लपून छपून धूम्रपान करताना दिसतात. मात्र, रेल्वे प्रवासात धूम्रपान करण्याची परवनागी नाही. ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि स्टेशनवर धूम्रपान केल्यास रेल्वेकडून कारवाई केली जाते.

अंमली पदार्थांच्या सेवनावर बंदी

ट्रेन आणि स्टेशनवर कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन केल्यास कारवाई केली जाते. तर रेल्वे प्रवास करताना कोणताही प्रवासी दारूचं सेवन करू शकत नाही. रेल्वेने प्रवास करताना दारू पिताना आढळल्यास १००० रुपयांचं दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर ट्रेनमध्ये दारूचं सेवन करण्याऱ्या व्यक्तीला शिक्षा देखील होऊ शकते.

प्रवासी तिकीट कधी रद्द करू शकतो?

दूरच्या प्रवासासाठी तुम्ही एखादं तिकीट बुक केलं असेल, त्यानंतर तुम्ही अचानक रद्द केल्यास त्याचे पैसे पुन्हा मिळू शकतात. मात्र, रेल्वेचं बुक केलेलं तिकीट तुम्हाला प्रवास करण्याआधी रद्द करावं लागतं. तुम्ही प्रवास करण्याआधी तिकीट रद्द केलं तर रिफंड मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

SCROLL FOR NEXT