Hernia Disease  Saam Tv
लाईफस्टाईल

Hernia Disease : सूर्यकुमार यादवला झालेला हर्निया आजार नेमका कसा होतो? लक्षणे काय?जाणून घ्या

Hernia Disease Causes : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्य कुमार यादवला हर्निया आजार झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासह मुंबई इंडियन्स संघाला धक्का बसला आहे. पण हर्निया हा आजार कसा होतो? याची कारणे काय? लक्षणे कशी दिसात? जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Hernia Disease Symptoms :

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्य कुमार यादवला हर्निया आजार झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासह मुंबई इंडियन्स संघाला धक्का बसला आहे. पण हर्निया हा आजार कसा होतो? याची कारणे काय? लक्षणे कशी दिसात? जाणून घेऊया.

हर्निया हा आजार (Disease) विशेषत: स्पोर्टस खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो. स्पोर्ट्स हर्निया हा आजार ओटीपोटात होतो. काही जणांमध्ये मांडीच्या वरच्या भागात, नाभी आणि कमरेच्या आसपासदेखील होतो.

हर्नियामध्ये कंबरेचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. हा आजार पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही होतो. मात्र याचा सर्वाधिक परिणाम हा पुरुषांवर होतो. यासाठी लॅप्रोस्कोपी, कोलेरेक्टल व रोबोटिक सर्जरीचा पर्याय आहे.

1. कसा होतो हर्निया आजार?

हर्निया या आजारामध्ये पोटाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. या कमतरेतमुळे पुरुषांच्या कमरेच्या भागात अधिक त्रास होतो. यामुळे रक्त प्रवाह थांबतो. ज्यामुळे अधिक समस्या उद्भवतात.

2. हर्नियाची लक्षणे (Symptoms) काय?

  • स्पोर्ट्स हर्निया ओटीपोटीच्या खाली आणि मांडीच्या दरम्यान होतो.

  • नाभीसंबधीचा हर्निया लहान मुलांमध्ये (Child) होतो. ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये याची प्रकरणे अधिक आहेत.

  • हर्नियामुळे पोटात फुगा तयार होतो. ज्यामुळे खोकल्यावर किंवा उभे राहिल्यावर पोटाच्या मध्यभागी दुखते.

  • शरीरात एखादी गाठ किंवा फुगा निर्माण झाल्यास दुर्लक्ष करु नका.

  • काही जणांच्या शरीरात फुगा दिसत नाही पण सतत पोटात दुखत राहाते.

3. उपाय काय?

  • हर्निया या आजार स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होतो. यावर कोणत्याही औषधांनी उपचार करता येत नाही.

  • ऑपरेशनद्वारे यावर उपाय करता येतो. सध्या यावर दुर्बिणद्वारे ऑपरेशन करण्यात येत आहे.

  • पुरेशी विश्रांती घेणे, फिजिकल थेरपी आणि कॉर्टिकोस्टेरॉईड्सने नियंत्रित करता येते.

  • शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ ते १२ आठवड्यात रुग्ण बरे होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT