Mahindra Scorpio Classic  Saam Tv
लाईफस्टाईल

Mahindra Scorpio Classic : भारतीय लष्कराच्या ताफ्यात आली स्कॉर्पिओ क्लासिक; काय आहेत वैशिष्ट्ये?

Indian SUV For Our Nation's Defenders : महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Army Ordered For Mahindra Scorpio Classic For Military : भारतीय आर्मीमध्ये सध्या महिंद्रा स्कॉर्पियोची क्रेझ आहे. महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ही माहिती महिंद्रा अॅंड महिंद्राने सोशल मीडियावरून दिली आहे.

महिंद्रा अॅंड महिंद्राने या माहितीचा खुलासा केला आहे. भारतीय लष्कराकडून कंपनीला 1850 युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे. मंहिद्रा अॅंड मंहिद्राने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. भारतीय लष्कराकडून स्कॉर्पिओ क्लासिकसाठी मोठी ऑर्डर देण्यात आली आहे.

आर्मीसाठी तयार करण्यात येणाऱ्या गाड्या बाजारात (Market) असलेल्या स्कॉर्पिओपेक्षा वेगळ्या आहेत. या गाड्या भारतीय लष्कराला सक्षम करण्याचे काम करणार आहे.(Latest News In Marathi)

आर्मीसाठी तयार केलेल्या स्कॉर्पिओला टाटा स्टॉर्म GS800 प्रमाणेच मॅट कॅमो हिरवा रंग देण्यात आला आहे. त्याशिवाय, स्कॉर्पिओ नवीन ग्रिल आणि अलॉय व्हीलसह जुन्या गाडीप्रमाणेच दिसते.

बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा (Mahindra) स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये, कंपनीने 2.2l mHawk डिझेल इंजिन दिले आहे. जे जास्तीत जास्त 132PS पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क तयार करते. ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन हे वैशिष्ट्य आहे. जे त्याच्या मागील चाकाला उर्जा देण्याचे काम करते. मात्र, लष्करासाठी तयार करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु 4X4 ड्राइव्हट्रेनसह 140PS/320Nm पॉवर दिली जाईल अशी शक्यता आहे.

नुकतीच माहिती देताना महिंद्राने सांगितले होते की, कंपनीने स्कॉर्पिओच्या 9,00,000 युनिट्सची विक्री केली आहे. सध्या कंपनी एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन प्रकारांमध्ये विकते. ज्यामध्ये स्कॉर्पिओ-एन नवीन वैशिष्ट्यांसह आणि डिझाइनसह बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. तर क्लासिक कोणत्याही प्रकारच्या डिझाइनशिवाय मजबूत आणि चांगला अनुभव देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

Dum Aloo: घरच्या घरी पाहुण्यांसाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT