Indian Air Force AFCAT Bharti 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दलात पायलट होण्याची सुवर्णसंधी; तब्बल ३०४ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Air Force AFCAT Bharti 2024 : एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) या भरतीसाठी हवाई दलाने जाहिरात काढली आहे. फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील ३०४ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Satish Daud

भारतीय हवाई दलाने एअरमन आणि अग्निवीरनंतर आता आणखी एका नोकर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) या भरतीसाठी हवाई दलाने जाहिरात काढली आहे. फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील ३०४ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी ३० मेपासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जून आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. AFCAT उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना हवाई दलात पायलटही होता येते. त्यासाठी फ्लाइंग ब्रँचमध्ये सहभागी व्हावे लागते.

IAF AFCAT 2024: AFCAT साठी शैक्षणिक पात्रता

फ्लाइंग ब्रांच पदासाठी अर्जदार ५० टक्के गुणांसह बारावी विज्ञान शाखेतून (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असावा. यासोबतच BE/B.Tech मध्ये ६०% गुण आवश्यक आहेत.

ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) शाखा- यासाठी देखील १२ वी विज्ञान शाखेत (गणित आणि भौतिकशास्त्र) ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच BE/B.Tech ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) शाखा – विज्ञान शाखेत (गणित आणि भौतिकशास्त्र) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ६०% गुणांसह कोणत्याही प्रवाहातून पदवी/पदव्युत्तर पदवीधर.

IAF AFCAT 2024 : AFCAT साठी वयोमर्याद

भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे.

IAF AFCAT 2024 : निवड प्रक्रिया

भारतीय हवाई दल AFCAT 2024 च्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, हवाई दल निवड मंडळ (AFSB) मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश होतो. AFCAT लेखी परीक्षा 300 गुणांची असते. दोन तास चालणाऱ्या या परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवाराला 3 गुण मिळतात. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.

IAF AFCAT 2024: अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम उमेदवाराला AFCAT वेबसाइट afcat.cdac.in वर जावे लागेल.

  • मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या IAF AFCAT 2 2024 लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • आता अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर असेल. त्यात आवश्यक माहिती भरा.

  • फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

  • आता अर्जाची फी भरा आणि सबमिट लिंकवर क्लिक करा.

  • अर्जाची प्रिंट आउट घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT