Independence Day Speech saam tv
लाईफस्टाईल

Independence Day Speech: तुमच्या मुलांना मराठीत लिहून द्या स्वातंत्र्यदिनाचं भाषण; ऐकून सगळेच करतील कौतुक

Independence Day Speech: यंदाच्या १५ ऑगस्टला आपल्या देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस आहे जेव्हा भारतातील जनतेने इंग्रजांच्या प्रदीर्घ गुलामगिरीतून मोकळा श्वास घेतला

Surabhi Jayashree Jagdish

या वर्षी आपण १५ ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १९४७ चा तो ऐतिहासिक दिवस, जेव्हा भारताच्या जनतेने शतकानुशतके चाललेल्या ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त श्वास घेतला. भारत हा अनेक धर्म, भाषा आणि संस्कृतींचा संगम असलेला देश असून, या विविधतेत एकतेची अनोखी ताकद आहे.

स्वातंत्र्यदिन हा त्या एकतेचा आणि स्वातंत्र्याचा जल्लोष असतो. या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असतं, शाळा, महाविद्यालयं, संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन सोहळे होतात. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी, नाट्य आणि स्वातंत्र्यलढ्यावर भाषणं सादर करून हा दिवस अधिक रंगतदार केला जातो. जर तुमच्याही मुलाला शाळेत भाषण करायचं असेल तर खालील मुद्दे तुमच्या फायद्याचे आहे

कशी करू शकता भाषणाची सुरुवात?

"आदरणीय गुरुजन, प्रिय बंधू-भगिनींनो,

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. आज आपण भारताला ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्ती मिळालेल्या दिवसाची आठवण साजरी करत आहोत. हा केवळ आनंदाचा दिवस नसून आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांना वंदन करण्याचा क्षण आहे. नागरिक म्हणून आपल्यावर देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याची जबाबदारी आहे. चला, आज आपण ठरवू या की आपल्या भारताला आणखी समृद्ध, सक्षम आणि ऐक्यपूर्ण बनवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू. जय हिंद!"

तुमची मुलं या पद्धतीनेही करू शकतात सुरुवात

"सर्व मान्यवर, उपस्थित बंधू-भगिनींनो,

आज १५ ऑगस्ट, आपण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस. आपल्या देशाने ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला आणि त्यात असंख्य वीरांनी बलिदान दिले. महात्मा गांधींचा अहिंसात्मक मार्ग, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल यांचे नेतृत्व या सर्वांच्या योगदानामुळे आपल्याला ही अमूल्य स्वातंत्र्याची भेट मिळाली. या दिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना कृतज्ञतेने स्मरण करतो."

सोपी आणि थेट सुरुवात

"सर्वांना शुभ सकाळ!

आज आपण भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आणि देशभक्तीची आठवण करून देतो. या प्रसंगी आपण एकतेचा, प्रगतीचा आणि देशसेवेचा संकल्प करूया. जय हिंद!"

भाषण प्रभावी करण्यासाठी टिप्स

  • श्रोत्यांचा अंदाज घ्या – त्यांचं वय, पार्श्वभूमी आणि समज लक्षात घेऊन मुद्दे निवडा.

  • सराव गरजेचा – भाषण आधी अनेकदा वाचा व उच्चार, टोन आणि थांबे योग्य ठेवा.

  • तथ्यांवर आधार द्या – तुमचे मुद्दे इतिहास आणि विश्वसनीय माहितीवर आधारित असावेत.

  • माहिती पडताळा – चुकीचे आकडे किंवा तथ्ये भाषणाची विश्वासार्हता कमी करतात.

  • वीरांचा गौरव – स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, नेते आणि जनतेच्या भूमिकेचा सन्मान करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

Maharashtra Live News Update: बिऱ्हाड आंदोलकांनी पुन्हा नव्याने दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT