Surabhi Jayashree Jagdish
ऑगस्ट महिना सुरू असून येत्या १५ ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत.
अशा वेळी तुम्हाला माहिती आहे का की तिरंग्यातील रंगांचा अर्थ काय असतो?
तीन रंगांचा भारताचा राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ म्हणून ओळखला जातो.
राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानी पिंगली वेंकैया यांनी केली होती. हा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी अधिकृतपणे स्वीकारण्यात आला.
तिरंग्यात तीन रंग आहेत. सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा आणि सर्वात खालच्या बाजूस हिरवा.
ध्वजातील या तिन्ही रंगांना आपापला वेगळा महत्त्वाचा संदेश आहे.
केशरी रंग हा धैर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे.
पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक दर्शवतो.
तिरंग्यातील हिरवा रंग हरिताई आणि समृद्धीचे प्रतीक आहे.