Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Surabhi Jayashree Jagdish

पिकनीक

तुम्हीही पिकनीकला जायचा प्लान करताय आणि गर्दी कमी असलेल्या ठिकाणी फिरून यायचं असेल तर आम्ही तुम्हाला नाशिकजवळची एक जागा सांगणार आहोत.

हिल स्टेशन

नाशिकजवळ एक खूप सुंदर आणि अजूनही फारसं प्रसिद्ध नसलेलं हिल स्टेशन म्हणजे पेठ

पेठ

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेलं पेठ आहे. हे ठिकाण त्याच्या घनदाट जंगलांसाठी, हिरव्यागार दऱ्यांसाठी आणि अनेक नैसर्गिक धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.

पावसाळा

पावसाळ्यात इथे सर्वत्र हिरवळ पसरते, डोंगर धुक्याने वेढलेले असतात आणि हवामान खूपच आल्हाददायक असतं. नाशिकमधील इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत इथे अजूनही पर्यटकांची गर्दी कमी असते, ज्यामुळे तुम्हाला निसर्गाचा शांत आणि खरा अनुभव घेता येतो.

थुगाव धबधबा

हा पेठमधील एक महत्त्वाचा आणि सुंदर धबधबा आहे. पावसाळ्यात त्याचं दृश्य मनमोहक असतं.

वाघोली धबधबा

हा देखील पेठ परिसरातील एक आकर्षक धबधबा आहे, जो पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो.

घनदाट वनराई

पेठ आणि आजूबाजूचा परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. इथे तुम्ही शांतपणे निसर्गभ्रमंती करू शकता, पक्षी निरीक्षण करू शकता

डोंगराळ रस्ते

पेठकडे जाणारे रस्ते पावसाळ्यात दोन्ही बाजूंनी हिरवाईने नटलेले असतात आणि डोंगरांमधून जातात.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा