Independence Day 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Independence Day 2024 : भारतात यंदा 77वा की 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय? वाचा आणि कन्फ्यूजन दूर करा

77th or 78th Independence Day : यंदा म्हणजे २०२४ मध्ये आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत की ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत यामध्ये काही व्यक्ती कन्फ्यूजन आहेत.

Ruchika Jadhav

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. तुम्ही सुद्धा यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी काही ना काही सेलीब्रेशन प्लान केला असेल. मात्र यंदा म्हणजे २०२४ मध्ये आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत की ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत यामध्ये काही व्यक्ती कन्फ्यूजन आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत तुमचं कन्फ्यूजन दूर करणार आहोत.

कन्फ्यूजन होईल दूर

स्वातंत्र्य दिनाबद्दल तुमच्या मनातील कन्फ्यूजन आजच दूर होईल. भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीपासून सुटका मिळाली. तेव्हापासून प्रत्येक भारतीय नागरिक हा ऐतिहासिक दिवस साजरा करत आहेत.

मात्र दर वर्षी नागरिकांच्या मनात यंदा कितवा स्वातंत्र्य दिन आहे याबद्दल संभ्रम असतो. त्यामुळे आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून किती वर्षे पूर्ण झाली आणि आता कितवं वर्ष सुरू आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

७७ वा स्वातंत्र्य दिन की ७८ वा स्वातंत्र्य दिन?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि हा आनंद दिवस साजरा केला होता. १५ ऑगस्ट १९४७ या तारखेपासून वर्ष मोजण्यास सुरुवात केली तर १९४७ मधील स्वातंत्र्य दिन पहिला स्वातंत्र्य दिन आहे. त्यानुसार पुढे वर्षे मोजली तर यंदा ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यावेळी साजरा केला जाणारा स्वातंत्र्य दिन ७८ वा असणार आहे.

स्वातंत्र्य दिनाबद्दल तुमच्या मनात असलेला हा संभ्रम आता दूर झाला असेल. त्यामुळे तुम्ही आजपासून पुढील सर्व वर्षे कितवा स्वांतत्र्य दिन आहे हे सहज मोजू शकता. उद्या साजरा केला जाणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासूनच बाजारात तिरंग्यामधील बिल्ले विकण्यासाठी आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT