15 August Speech in Marathi Saam TV
लाईफस्टाईल

15 August Speech in Marathi : स्वातंत्र्यदिनी देशावरील प्रेम व्यक्त करताना करा 'हे' जबरदस्त भाषण; टाळ्यांचा होईल कडकडाट

15 August Bhashan : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. देश स्वातंत्र झाल्यानंतर संपूर्ण देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. सर्वत्र आपण मुक्त झाल्याचा जल्लोष मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

Ruchika Jadhav

या वर्षी भारतात १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. देश स्वातंत्र झाल्यानंतर संपूर्ण देशातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. सर्वत्र आपण मुक्त झाल्याचा जल्लोष मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावागावात १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.

या दिवशी सर्व व्यक्ती सुंदर पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करतात आणि राष्ट्रगीत म्हणतात. शाळा आणि महाविद्यालयांत तसेच काही ऑफिसमध्ये या दिवशी भाषण सुद्धा केलं जातं. आता तुम्हाला देखील या दिवशी सुंदर भाषण करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक दमदार भाषण तयार केलं आहे.

भाषण

आदरणीय प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे तसेच माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम, माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या भरपूर शुभेच्छा. आज देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. यंदा 'विकसित भारत' या थिमवर आपला देशा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस फार महत्वाचा आहे . २०० वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला सोडवण्यासाठी अनेक देशप्रेमींनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी काम केलंय.

या सर्वच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी सर्व भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक होत आदरांजली वाहिली पाहिजे. तसेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतात. यावेळी ३१ तोफांची सलामी देखील दिली जाते. लष्कराच्या तुकड्यांकडूनही सलामी दिली जाते. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. भाषण संपवताना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

Kapil Sharma: सलमान खाननंतर कपिल शर्माला का टार्गेट करतेयं लॉरेन्स बिश्नोई टोळी? 'हे' आहे खरे कारण

SCROLL FOR NEXT