ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज १५ ऑगस्ट, देशाचा ७७व्या स्वातंत्र्य दिवस सर्वच भारतीय उत्साहात साजरा करत आहोत.
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने “भारत माझा देश आहे…” ही प्रतिज्ञा शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर सई ताम्हणकरने पांढऱ्या रंगाच्या शेडची साडी नेसून, ‘भारतीय नारी’ कॅप्शन देत फोटो शेअर केला.
सोबतच समीर चौघुलेने देखील आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर पुजा सावंत हिने हातात ध्वज घेत फोटो शेअर केला आहे.
तर सना शिंदेने देखील ‘महाराष्ट्र शाहीर’ मधला लूक शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता माळीने देखील चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोबतच गौरव मोरने देखील हातात तिरंगा घेत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.