Pan Aadhaar Link Saam TV
लाईफस्टाईल

PAN Card Update : मोठी बातमी! पॅन - आधार कार्डशी जोडा, अन्यथा...;आयकर विभागाने दिला इशारा

पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडणे अनिवार्य आहे, त्याला उशीर न करता लिंक करा, असे आयकर विभागाने निवेदनात लिहिले आहे.

Vishal Gangurde

Pan Aadhaar News : पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. ज्या पॅनकार्ड धारकाने त्यांचे कार्ड आधारकार्डशी पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत जोडले नसल्यास ते रद्द समजले जाईल, असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडणे अनिवार्य आहे, त्याला उशीर न करता लिंक करा, असे आयकर विभागाने निवेदनात लिहिले आहे. (Latest Marathi News)

आयकर कायदा १९६१ नुसार, सर्व पॅन कार्डधारकांना (Pan Card) त्यांचे कार्ड हे आधारकार्डला जोडणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी आयकर विभागाने (Income Tax Department) कार्डधारकाला ३१ मार्च २०२३ शेवटची मुदत दिली आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने मे २०१७ मध्ये जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, या सक्तीतून केवळ विशिष्ट गटांनाच सवलत देण्यात आली आहे. या कायद्यातून आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय या राज्यांमध्ये राहणारे व्यक्ती आणि आयकर कायदा, १९६१ नुसार अनिवासी नागरिकांना सवलत मिळणार आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्स टॅक्सेसने ३० मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 'पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास, सदर व्यक्ती आयटी कायद्यांतर्गत त्या सर्व परिणामांना जबाबदार असेल. त्या व्यक्तीला सर्व परिणाम भोगावे लागतील. तसेच पॅनकार्ड निष्क्रिय झालेल्या धारकांना आयकर रिर्टन देखील भरता येणार नाही. त्याचबरोबर परताव्यांची प्रक्रियाही केली जाणार नाही. तसेच त्या धारकाला बँका आणि इतर आर्थिक पोर्टल सारख्या मंचावर अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे पॅनकार्ड हे आधारकार्डशी जोडणे गरजेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT