Aadhar Card News : तुमचा आधार क्रमांक दुसऱ्यांना माहीत आहे? बँक फ्रॉड होऊ शकतो का? जाणून घ्या

आधार कार्ड क्रमांक दुसऱ्यांना माहिती असेल तर, बँक फ्रॉड होऊ शकतो का? जाणून घ्या नेमके उत्तर
Aadhar Card News Cyber Fraud
Aadhar Card News Cyber FraudSAAM TV

UIDAI Aadhar Card News Update : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने अलीकडेच लोकांना सार्वजनिक कॉम्प्युटरवर आधार कार्डचा वापर करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यूआयडीएआयने यासंबंधी ट्विट केले आहे. इंटरनेट कॅफेमध्ये सार्वजनिक कॉम्प्युटरवर ई आधार कार्ड डाउनलोड करणे टाळावे किंवा काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात सतर्कतेचा इशारा या ट्विटद्वारे दिला आहे.

डीमॅट खातं किंवा बँक खातं (Bank) उघडणं आणि आधार केवायसी व्हेरिफाय करणे ही एक महत्वाची बाब झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत सांगितलं की, जर तुमचा आधार क्रमांक, जन्मतारीख किंवा पत्ता उघड होत असेल तर, बँक खाते हॅक होण्याचा कोणताच धोका नाही. मात्र, ग्रंथालये, सायबर कॅफे, हॉटेल्स आदी ठिकाणी सार्वजनिक वापरातल्या कॉम्प्युटरवर बँकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तात्काळ लॉगऑफ करण्याचा सल्ला दिला आहे. (Aadhar Card News)

Aadhar Card News Cyber Fraud
Aadhar Card Update | तुमचे आधार कार्ड बनवा सुपर स्ट्राँग, वाचा काय आहे ट्रिक

यूजरचा प्रामाणिकपणा पडताळण्यासाठी अनेक बँकिंग सुरक्षा (Bank Security) प्रोटोकॉल उपलब्ध आहेत. उदाहरण म्हणून तुमच्या एटीएम कार्डचा एक पिन असतो. तुमचा नेट बँकिंग अॅक्सेस ओटीपी आणि एका अद्वितीय कॅचफ्रेजद्वारे सुरक्षित ठेवला जातो. तो विशिष्ट क्रमांक केवळ तुम्हालाच ठाऊक असतो. फक्त आधार कार्ड दाखवून कोणत्याही बँकेच्या शाखेत तुमच्या खात्यातून रक्कम काढली जाऊ शकत नाही. कारण स्वाक्षरी आणि अन्य दस्तावेज आणि उपलब्ध नोंदी या पडताळून खात्री करून घेतली जाते.

Aadhar Card News Cyber Fraud
Breaking News | सायबर क्राईमसाठी भारतीयांचा वापर !; 300हुन अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस

हॅकर्स तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाहीत!

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बँकिंग आणि वित्तसंस्था ग्राहकांच्या इंटरनेट सुरक्षेची काळजी न घेता सुरक्षित बँकिंग व्यवहारांसाठी सर्टिफिकेट पिनिंगसारखे सुरक्षा प्रोटोकॉल लागू करतात. ग्राहकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये म्हणजेच एफएक्यूमध्ये युआयडीएआयच्या दाव्यानुसार, तुमचा एटीएम कार्ड क्रमांक उघड झाला तरी, कुणीही एटीएममधून पैसे काढू शकत नाही. त्याचबरोबर केवळ तुमचा आधार क्रमांक माहीत असेल तरीही हॅकर्स तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाहीत किंवा अन्य सेवांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

सायबर फसवणूक होऊ शकते

तुमचा आधार क्रमांक अन्य कोणत्या व्यक्तीला माहिती असेल तरी, बँक खाते हॅक होऊ शकत नाही. मात्र, त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. तुमची सायबर फसवणूक मात्र होऊ शकते. ई आधार तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत आहे आणि हा अनेक सेवांसाठी केवायसीचा एक वैध प्रमाण आहे. त्यामुळे जर तुम्ही यूआयडीएआयच्या वेबसाइटवर लॉग इन करून आपला ई आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सायबर कॅफेचा वापर करत असाल तर, तुम्ही तुमची सायबर सुरक्षा धोक्यात टाकत आहात, असा सल्लाही जाणकार देत आहेत.

तुमची सर्व माहिती चोरीला जाऊ शकते

संगणक वापरल्यानंतर लॉग आउट करणे आणि सर्व डाउनलोड केलेल्या प्रती कायमस्वरुपी हटवल्या आहेत का हे सुनिश्चित करण्याचा सल्ला या क्षेत्रातील जाणकार देतात. जर तुम्ही असं केलं नाही तर, सायबर चोर तुमची सर्व खासगी माहिती चोरू शकतात. त्यात अंगठ्याचे ठसे, बायोमेट्रिक डेटा आणि अन्य माहितीचा समावेश होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com