Hair falls problems after pregnancy, Hair care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

प्रसुतीनंतर केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी या पदार्थाचा आहारात समावेश करा

गरोदरपणाच्या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गरोदरपणाच्या काळातील ९ महिने खूप सुंदर असतात. या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Hair care tips in Marathi)

हे देखील पहा -

प्रसुतीनंतर काही समस्या राहतात त्यातील समस्या म्हणजे केस गळण्याची समस्या. गर्भधारणेनंतर केसगळतीमुळे आपल्याला त्रास होतो. यादरम्यान काहींचे केस वाढतात तर काहीचे केस सतत गळतात अशावेळी आपण आपल्या आहारात बदल केला तर केस गळीतीची समस्या कमी होऊ शकते. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

१. गर्भधारणेनंतर केसांची काळजी घेण्यासाठी, आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. कॅल्शियम, प्रोटीनसह अनेक खनिजे डेअरी उत्पादनांमध्ये आढळतात, जे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतात.

२. दह्यामध्ये ओमेगा ३ आणि फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे केस गळणे कमी होते. त्यासाठी दह्याचे सेवन करायला हवे. दुधामध्ये फॅट आढळते जे केसांना मॉइश्चरायझ करते. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. पनीरमध्ये सेलेनियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. जे केस गळणे थांबवते. अंड्यांमध्ये झिंक आढळते जे केसांसाठी चांगले मानले जाते. त्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा ज्यामुळे केसगळतीची समस्या टाळता येईल.

३. केस गळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी फळांचे सेवन करणे चांगले असते. जीवनसत्त्वे ई, सी, ए, पोटॅशियम, जस्त यासह अनेक खनिजे फळांमध्ये आढळतात. गरोदरपणानंतर केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी फळांचा आहारात नक्कीच समावेश करा.

४. सफरचंदात व्हिटॅमिन (Vitamins) ए आढळते, जे केसांच्या (Hair) वाढीसाठी खूप चांगले मानले जाते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस गळणे कमी होते. त्यासाठी आंब्याचे सेवन करा. अननसात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात. जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले आहे. रताळ्यामध्ये झिंक आढळते जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले आहे. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे स्कॅल्प मजबूत करण्याचे काम करते. कोबीमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT