Bone Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Bone care : हिवाळ्यात हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समावेश करा 'या' पदार्थांचा !

उठताना, झोपताना आणि बसताना वेदना झाल्यामुळे तुम्हाला हाडांचा त्रास अनेकांना होताना दिसून येतो.

कोमल दामुद्रे

Bone Health Tips : सकाळी व्यायाम करायला घेतला आणि अचानक गुडघे दुखी सुरु झाली का ? उठताना, झोपताना आणि बसताना वेदना झाल्यामुळे तुम्हाला हाडांचा त्रास अनेकांना होताना दिसून येतो.

बदलेल्या ऋतूनुसार हिवाळ्यात ४० शी ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण ही समस्या नेमकी कशी होते. यासाठी काय करायला हवे. निरोगी असूनही आपण अस्वस्थ का असतो. हे जाणून घेऊया

प्रौढांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते आणि त्याशिवाय त्यांची हाडे मजबूत राहतात. कॅल्शियमसोबतच मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी इत्यादींचीही गरज असते आणि त्यानंतरच शरीर निरोगी ठेवता येते.

बहुतेक लोक हे समजतात की दूध पिणे आणि उन्हात बसणे हाडांच्या समस्या दूर करते, परंतु हे पुरेसे नाही. आपल्या रोजच्या आहारात अशा अनेक गोष्टी असाव्यात ज्या हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात. डायटीशियन अंजली मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हाडे मजबूत करण्याचे काही उपाय शेअर केले आहेत. अंजली जवळपास 20 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे आणि ती डाएट टिप्स तज्ज्ञ देखील आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. गाजर आणि पालक

जर 6 कच्ची गाजर आणि 50 ग्रॅम पालकाचा रस रोज प्यायल्याने तुमच्या शरीरातील 300 मिलीग्राम कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकते. हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे त्वचा देखील सुधारू शकते. गाजर आणि पालकाच्या मदतीने तुमची त्वचा चमकू शकते.

Food

2. संपूर्ण धान्य

संपूर्ण डाळी जसे की राजमा, काबुली चना, काळी डाळ, कुळीथ इत्यादींमध्ये 200-250 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही त्यांचा आहारात समावेश करू शकता. जर तुम्हाला गॅस, पित्त किंवा अपचन सारख्या समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करा. शरीराला ते पचायला जास्त वेळ लागतो आणि अशा परिस्थितीत गॅसची समस्या देखील उद्भवते.

3. काळ्या आणि पांढर्‍या तीळाचे सेवन

तुम्ही तुमच्या आहारात 2-3 चमचे पांढरे आणि काळे तीळ समाविष्ट करू शकता. 100 ग्रॅम तिळामध्ये 1400 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही तिळाची चटणी बनवू शकता आणि ती अनेक प्रकारे वापरू शकता. हिवाळ्यात तीळ तुमच्या आहारात अवश्य ठेवा. परंतु, एकाच वेळी खूप तीळ खाऊ नका कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. ते शरीरातील उष्णता देखील वाढवू शकतात.

4. या गोष्टी कॅल्शियम वाढवतात

तुम्ही तुमच्या आहारात मासे, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, सोयाबीन, अंजीर आणि तृणधान्ये यांचा समावेश करावा. या गोष्टी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण सुधारण्यासाठी काम करू शकतात. आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्या ठेवा. हिवाळ्यात रोज चाकवत, पालक, मेथी यासारख्या गोष्टी खा. ते बनवताना जास्त तेल आणि मसाले वापरू नका. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्या ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि शरीरातील अनेक प्रकारची कमतरता दूर होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT