how to take care of your child at monsoon
how to take care of your child at monsoon  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळा येण्यापूर्वी मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलेल्या ऋतूनुसार मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे त्यांना सर्दी व खोकल्यासारखे आजार होतात.

हे देखील पहा -

पावसाळा सुरू झाला किंवा तो सुरू होण्यापूर्वीच अनेक संसर्गजन्य आजार होऊ लागतात. अशावेळी आपण मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी. मुलांना पावसात भिजायला जरी आवडत असले करी त्यानंतर ते आजारी पडू लागतात. पावसाळ्या येण्यापूर्वी त्यांच्या आहारात बदल करा. त्यांना कोणते पदार्थ खायला द्यायचे हे जाणून घ्या.

या पदार्थांचा आहारात समावेश करा.

१. मुलांना रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्यास द्या. हळदीत अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत. जी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते व इतर संसर्गापासून दूर राहण्यास देखील मदत करते.

२. मुलांच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे व डायफ्रूटचा समावेश आपण करु शकतो. मुलांना फळे किंवा डायफ्रूट हे स्नॅक्स म्हणून आपण त्यांना खायला देऊ शकतो. यात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यास मदत होईल.

३. मुलांच्या आहारात जास्तीत जास्त हंगामी फळे (Fruit) आणि भाज्यांचा समावेश करा. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत यांचे सेवन केल्यास मुलांच्या शरीराला बॅक्टेरिया आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात. जांभूळ, पेरू, चेरी यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. याशिवाय मुलांच्या आहारात टोमॅटो, ब्रोकोली, गवार, करवंद अशा हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामध्ये आढळणारे फायबर, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि प्रथिने मुलांना पोषण देतील

४. आपली मुले (child) पालेभाज्या खात नसतील तर आपण त्याचे सूप देखील बनवू शकतो. तसेच त्यांना मशरूमचे सूप देखील देऊ शकता. त्यात व्हिटॅमिन डी आणि अँटिऑक्सिडंट्सचे असल्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत ठेवून शारीरिक विकासात वाढ होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT