Winter Health Care
Winter Health Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Health Care : थंडीत अनेक आरोग्यावर रामबाण ठरेल तुळस, याप्रकारे करा सेवन !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Health Care : तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. याआधीही अनेक आजारांवर उपचार केले जात होते आणि आजही शेकडो आजारांमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ त्याचा वापर करतात.(Disease)

त्याच वेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (Health)

सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल

तुळशीच्या बियांचा वापर करुन पोटाची समस्या देखील दूर होते. कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास मल पास होणेही सोपे होते.

तुळशीच्या बिया नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीराच्या आतड्याची हालचाल वाढण्यास मदत होते. कोमट दूध आणि पाण्यासोबत तुळशीचे सेवन केल्यास पचनाच्या समस्यांशिवाय पोट फुगणेही कमी होते.

डायबेटीज रुग्णांसाठी मोठे वरदान -

तुळशीच्या बियांचे सेवन डायबेटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते. जे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी तुळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवाव्या लागतील. त्यानंतर सकाळी एक ग्लास दुधात या बिया टाकून प्या. यामुळे तुम्हाला इन्सुलिनमध्ये सुधारणा दिसून येईल.

वजन कमी करण्यास मदत -

जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुळशीच्या बिया तुमचे वजन कमी करू शकतात. तुळशीमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय त्यात अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड कंपाऊंड देखील आहे. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळणार

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

SCROLL FOR NEXT