वास्तुशास्त्रानुसार, घरातील किचन हे सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. किचनमध्ये कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, याचाही घरावर परिणाम होत असल्याचं मानलं जातं. स्वयंपाकघरातील वस्तू योग्य जागी ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. पण किचनमधील एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो, असंही म्हटलं जातं.
अशाच महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे मीठ. रोजच्या स्वयंपाकात वापरलं जाणारं मीठ केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर वास्तुशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी आहे. त्यामुळे किचनमध्ये मीठ योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवणं शुभ मानलं जातं. मग वास्तुशास्त्रानुसार मीठ नेमकं कुठे ठेवावं? त्याचप्रमाणे ते ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये मीठ ठेवण्यासाठी पश्चिम दिशा चांगली मानली जाते. या दिशेला मीठ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि सुख-समृद्धी येते असं मानलं जातं. याशिवाय मीठ ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. मीठ नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या स्वच्छ डब्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो
मीठ कधीही स्टीलच्या डब्यात ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. कारण स्टील आणि लोखंडाचा संबंध शनिच्या धातूशी जोडला जातो. त्यामुळे या धातूंच्या डब्यात मीठ ठेवणं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही.
किचनमध्ये मीठ ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, पुढील चुका टाळाव्यात.
मीठ नेहमी झाकण असलेल्या डब्यात ठेवावं. ते उघडं ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं मानलं जातं.
मिठासाठी काचेचा किंवा सिरॅमिकचा डबा वापरणं शुभ मानलं जातं.
मिठाचा डबा कचऱ्याच्या डब्याजवळ किंवा ओलावा आणि घाण असलेल्या जागी ठेवणं टाळावं.
मीठ काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करावा. त्यामुळे मिठात ओलावा किंवा घाण जाण्याची शक्यता कमी होते.
किचनमध्ये मीठ इतर मसाल्यांच्या डब्यांसोबत ठेवू नये. असं केल्याने ग्रह कमजोर होतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मिठाचे काही उपाय सांगितले आहेत. यासाठी एका काचेच्या वाटीत खडे मीठ घेऊन ती वाटी घरातील किचनमध्ये ठेवावी. हे मीठ ठराविक काळाने बदलत राहावं. त्याचप्रमाणे घरात फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकण्याचाही सल्ला दिला जातो. या उपायांमुळे घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.