High Blood Pressure saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure: गावखेड्यांत हाय ब्लडप्रेशर वाढला! 3 पैकी 1 व्यक्ती त्रस्त, कारणे आणि आकडेवारी धक्कादायक

Tata Memorial Centre Study: महाराष्ट्रातील बार्शीमध्ये झालेल्या अभ्यासातून ग्रामीण भागातील प्रत्येक तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलंय. अनेकांना आजाराची माहितीच नाही. टाटा मेमोरियल सेंटरच्या अभ्यासातील धक्कादायक आकडेवारी, रक्तदाब नियंत्रण आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. परंतु अनेकांना आपल्याला हा त्रास आहे याची असल्याची कल्पनाच नसल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रातील बार्शीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आलीये. या अभ्यासानुसार, ग्रामीण भागातील प्रत्येक तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. यापैकी अनेकांना याची माहिती नसल्याने वेळेवर उपचारही मिळत नाहीत.

टाटा मेमोरियल सेंटरने जवळपास ४० हजार लोकांवर हा अभ्यास केला. या अभ्यासात उच्च रक्तदाब असलेल्या आणि औषधं घेणाऱ्या रुग्णांपैकी केवळ ३९ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात असल्याचं आढळलं. हा अभ्यास 'npj Cardiovascular Health' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

या अभ्यासात सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी ३१ टक्के जणांना उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलंय. त्यापैकी केवळ ६ टक्के लोकांना आधीपासूनच आपल्याला हा त्रास असल्याची माहिती होती. तर तब्बल २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असूनही त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पुरुषांमध्ये या आजाराबाबत जागरूकता महिलांच्या तुलनेत कमी असल्याचंही पाहायला मिळालं. केवळ १४ टक्के पुरुषांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याचं माहीत होतं. महिलांमध्ये हे प्रमाण २१ टक्के होतं.

२०१५ ते २०२० या काळात 'इंडियन स्टडी ऑफ हेल्दी एजिंग' (ISHA) अंतर्गत जमा करण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा संशोधकांनी अभ्यास केला. टाटा मेमोरियल सेंटरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिऑलॉजी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मिळून हा अभ्यास केला. यामध्ये ३० ते ६९ वयोगटातील लोकांचा समावेश होता. सहभागी लोकांचा रक्तदाब, यापूर्वी उच्च रक्तदाबाचे निदान झालं होतं का आणि त्यासाठी औषधं घेतली जात होती का, याची माहिती तपासण्यात आली.

वय वाढताच उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो

या अभ्यासात वय वाढत जाईल तसा उच्च रक्तदाबाचा धोका वाढत असल्याचं आढळून आलं. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा पूर्वीपासून त्रास असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होतं.

उच्च रक्तदाब असल्याची माहिती असलेल्या लोकांपैकी सुमारे ७३ टक्के जण औषधं घेत होते. पण औषधं घेऊनही त्यापैकी केवळ ३९ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात होता. म्हणजेच उपचार सुरू असूनही अनेकांचा रक्तदाब वाढलेलाच होता. यामुळे अशा लोकांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

वेळेवर तपासणी करणं गरजेचं

टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) चे संचालक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाची तपासणी करणं गरजेचं असल्याचं सांगितलंय. वेळेवर तपासणी केल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीच्या दीर्घकालीन आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यास मदत होऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थचे संशोधक बॅस्टियन बोहरमन यांनीही या अभ्यासातील एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलंय. तरुण वयातील अनेक लोकांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं आढळणं ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. तरुण वयात या आजाराचं निदान झालं नाही तर अनेक वर्षे व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास राहू शकतो. यामुळे पुढील आयुष्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नियमित औषधे घेणं, वेळोवेळी रक्तदाब तपासणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. अनेक रुग्ण औषधं घेत असूनही त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाची नियमित तपासणी होणं, आजाराचं लवकर निदान होणं आणि रुग्णांनी दीर्घकाळ उपचार सुरू ठेवणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि भविष्यातील गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात एमडी ड्रग्ज, तीन पिस्तुलांसह सात जणांना अटक

High Court : कौटुंबिक वाद म्हणजे क्रूरता नाही! हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Eye Twitching Problem : डोळे अचानक का फडफडतात? यामागचं नेमकं कारण काय?

Old Monk : ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरु होणार? अखेर कंपनीने 'ती' अट मान्य केली

गोकुळमध्ये मोठा राजकीय भूकंप! कोरमच्या तिढ्यामुळे सत्तासंघर्ष टोकाला; हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT