Hair care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

केसांत कोंडा होत असल्यास या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करा

आपल्यापैकी बरेच महिला व पुरुष केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बरेच महिला व पुरुष केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. केस अकाली पिकणे, सतत गळत राहाणे व केसांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यामुळे ते सतत चिंतेत असतात.

हे देखील पहा -

कोंड्याची समस्या बर्‍याच लोकांना त्रास देत असते. ही समस्या एकदा सुरु झाली की, लवकर जात नाही. अनेक औषधे, आहारातील बदल, कोंडा घालवण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू असे अनेक प्रयोग आपण करत असतो. परंतु, आपल्या केसांत कोंडा का होतो हे बऱ्याच जणांना माहित नसेल. जीवनशैलीतील बदल, प्रदूषण, खराब आहार आणि केसांत सतत घाम जमा झाल्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू लागते अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

केसातील कोंडा कमी करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वापर करा

१. केसातील (hair) कोंडा कमी करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या पानांचा वापर करु शकतो. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा, गाळून घ्या आणि त्या पाण्याने (Water) आपले केस धुवा. गरम पाण्याने केस धुतल्यास केस गळतीची समस्या सुरू होईल त्यासाठी पाणी थंड करुन केस धुवा.

२. आपले केस रखरखीत व कोरडे असतील व त्यात कोंडा होत असेल तर आपण दही व त्रिफळाचा हेअर पॅक केसांसाठी वापरल्यास फायदा होईल. दह्यात त्रिफळ चूर्ण ४ ते ५ तास भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० ते ४० मिनिटे हा हेअर पॅक केसांना लावा व कडुलिंबाच्या पाण्याने केस धुवा. असे केल्यांना केसातील कोंडा कमी होईल.

३. कुंकू खोबऱ्याच्या तेलात (Oil) मिसळून रात्रभर केसांना लावा व दुसऱ्या दिवशी हर्बल शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने आपले केसांतील कोंडा निघून जाण्यास मदत होईल. आपले केस अधिक निरोगी होतील आणि कोंड्याच्या समस्येपासून लवकर सुटका मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : मीठ ठरतंय सायलेंट किलर; वाढतोय हॉर्ट अटॅकचा धोका, कसा वाचवाल जीव?

Jalebi Recipe: बाजारात मिळणारी रसाळ टेस्टी जिलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Mumbai : मिरवणुकीदरम्यान दोन गटात हाणामारी, मुंबईतल्या परळमध्ये तणाव

Maharashtra News Live Update: पोषक वातावरण आणि समाधानकारक पाऊस त्यामुळे भाताच्या पिकाला बहर

Nepal floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 157 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता; 133 भारतीय नागरिकांचाही समावेश

SCROLL FOR NEXT