केस चमकदार बनवण्यासाठी या कडधान्याचा वापर करा

हरभऱ्यापासून आपण भाजी किंवा भिजवलेले हरभरे हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग असायला हवा.
Hair care tips in Marathi
Hair care tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : उकडलेले कडधान्य आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत नाही. परंतु, कडधान्यातील हरभऱ्यापासून आपण केसांची निगा राखू शकतो.

हे देखील पहा -

हरभऱ्यापासून आपण भाजी किंवा भिजवलेले हरभरे हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग असायला हवा. प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी भरलेला हरभरा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळे हरभरे केसांवरही खूप गुणकारी आहे. आपल्या केसांच्या निगा राखण्यासाठी व केसांची चमक वाढवण्यासाठी आपण त्याचे सेवन किंवा हेअर मास्क कसा वापरावा या विषयी जाणून घेऊया.

हे उपाय करून पहा-

१. हल्ली तरुणांमध्ये पांढऱ्या केसांची (Hair) समस्या वाढताना दिसून येत आहे. पांढऱ्या केसांची समस्या रोखण्यासाठी आपण काळ्या हरभऱ्याचे सेवन करायला हवे. यामध्ये असणारे प्रोटीन आणि मॅंगनीज असल्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

Hair care tips in Marathi
हेअर स्पा करताय तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या

२. केस गळतीने त्रस्त असाल तर काळ्या हरभऱ्याचा हेअर मास्क आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. काळ्या हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीरातील झिंक आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करून केस गळती थांबवते.

३. डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी आपण काळ्या हरभऱ्याची पेस्ट बनवून केसांना लावावी. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने (Water) धुवा. यामुळे केसांचा कोंडा कमी होण्यास मदत होईल.

४. कोरड्या केसांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अंडी, लिंबाचा रस, दही व काळ्या हरभऱ्याची पावडर एकत्र करुन केसांना हेअर मास्क लावू शकतो. त्यांना अर्ध्या तासांने केस स्वच्छ (Clean) धुवा. केस मऊ व चमकदार होतील.

५. काळ्या हरभऱ्यात झिंक आणि व्हिटॅमिन बी-६ भरपूर प्रमाणात आहे. तसेच हरभऱ्यामध्ये असलेले प्रोटीन आरोग्यासाठी चांगले आहे. काळ्या हरभऱ्याचे सेवन करून किंवा त्याचा हेअर मास्क लावल्यास आपले केस लांब आणि दाट होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com