Bones problem, Health issue, healthy eating habits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चुकीच्या आहारामुळे होऊ शकतात आपली हाडे कमजोर!

वयोमानानुसार आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वयोमानानुसार आपल्याला अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, जीवनसत्त्व व कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. (healthy eating habits)

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जंक फूड खाण्याची सवय असते. त्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात जीवनसत्त्व मिळत नाही. मजबूत हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करायला पाहिजे. शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यामुळे आपल्याला कंबरदुखी, पाठदुखी व गुडघेदुखीच्या इतर समस्यांना सामोरे जावे लागते. त्या व्यतिरिक्त आपल्याला आहारात काही पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात झाल्याने हाडे कमकुवत होतात.

१. दूध (Milk) हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूध हे नुसते प्यायला आवडते. त्यात कोणतेही पदार्थ न घातल्यामुळे त्याचे शरीराला फायदे मिळत नाही. तसेच दूधात असणारे कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व शरीरातून बाहेर पडतात व हाडे कमकुवत होतात. दुधाची चव वाढविण्यासाठी आपण काही औषधी वनस्पती जसे की तुळस, वेलची आणि हळद इत्यादी घालू शकता. ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतील.

२. शरीरात मीठाचे प्रमाण अधिक झाल्यास देखील हाडे कमकुवत होतात त्यामुळे आपल्याला आहारात मीठाचे प्रमाण हे कमी असायला हवे. शरीरात मीठाचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते त्यामुळे आपल्या आहारात पाच ते दहा ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचे प्रमाण असू नये.

३. कोल्ड्रिंक्सचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याच्या हाडांवर विपरीत परिणाम होतो व हाडे ठिसूळ होतात. कोल्ड्रिंकमध्ये सोडा व फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. फॉस्फरस हाडांमधली कॅल्शियमचे व मॅग्नेशियमचे शोषण करते. त्यामुळे आपली हाडे कमकुवत होतात.

४. थकवा व झोप उडवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण कॉफीचे (Coffee) सेवन अतिप्रमाणात करतात. त्यामुळे आपल्या हाडांना इजा होऊ शकते. आपण दिवसातून ४ ते ५ कप कॉफीचे सेवन करत असू तर निश्चितच हाडांमध्ये कॅल्शियमची क्षमता कमी करते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. त्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

SCROLL FOR NEXT