Aadhar Card News
Aadhar Card News Saam tv
लाईफस्टाईल

Aadhar Card News: मतदारांसाठी महत्वाची बातमी! 'आधार' क्रमांक नसेल तरी मतदार यादीतून नाव काढणार नाहीत

कोमल दामुद्रे

Important News For Voters : निवडणूका जवळ आल्या की, आपल्यापैकी अनेक जण जागे होतात. काहीवेळेस हयात नसलेल्या व्यक्तीचे नाव देखील मतदार यादीत येते परंतु, यामध्ये देखील मृत व्यक्तीचे नाव कमी करता येणार नाही असे देखील म्हटले जात आहे.

आगामी सार्वत्रिक लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दि.१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

यामध्ये पूर्व - पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक (Election) अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय – विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, पुनरीक्षण-पूर्व उपक्रम कार्यक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे (Rules) आणि मार्गदर्शक सूचना तसेच, नवीन आयटी अॅप (IT Application) आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीतकरण मतदार यादी, तसेच मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे त्याचा 1-8 असा नमूना तयार करणे, यावर आधारित पुरवणी व एकत्रित अशी यादी तयार करणे असा कार्यक्रम आहे.

तसेच याबाबत लागणारी माहीती देखील गोळा करता येणार आहे. एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती ही माहीतीही गोळा करणार आहेत.

अर्जदार नमूना अर्ज क्र. ६ व नमूना अर्ज क्र. ८ भरताना त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास स्वेच्छेने आधार कार्ड क्रमांक नमूद करेल. जर आधार कार्ड क्रमांक नसेल किंवा उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दर्शविली या कारणास्तव मतदार यादीत नोंदणीसाठीचा अर्ज नाकारण्यात येणार नाही किंवा मतदार यादीतील नोंद वगळण्यात येणार नाही.

भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार, मतदार नोंदणी अधिकारी नमूना अर्ज क्र. 5 मध्ये नोटीस जारी करून वर्षाच्या चारही अर्हता दिनांकावर आधारीत दावे व हरकती सादर करता येईल. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. सन २०२३ पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोंबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल.

मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

महिला आणि दिव्यांग,वंचित घटकांसाठी, तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत.मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यात सध्या वयोगटनिहाय अंदाजे असलेली मतदार संख्या आणि प्रत्यक्षात दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार नोंदणी केलेली संख्या पुढीलप्रमाणे आहे.

१८ ते १९ वयोगटातील ४२,९८,७५६ असून प्रत्यक्ष नोंद ७९,९२,२१०

२० ते २९ वयोगटातील २,२८,५४,६९३ प्रत्यक्ष नोंद १,६४,०५,१८१

३०-३९ वयोगटातील मतदार २,१५,६०,६४३ प्रत्यक्ष नोंद २,०५,४४,४८०

४० ते ४९ वयोगटातील मतदार १,७३,७४,०१० प्रत्यक्ष १,९८,४०,२४३

५० ते ५९ वयोगटातील मतदार १,३०,०२,२१९ प्रत्यक्ष १,४८,१७,६९१

६० ते ६९ वयोगटातील मतदार ८२,०५,५९३ प्रत्यक्ष नोंद ९५,८९,५३१

७० ते ७९ वयोगटातील मतदार ४९,१९,०३५ प्रत्यक्ष नोंद ५३,२१,६२८

८० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मतदार १८,४०,२६६ प्रत्यक्ष नोंद २९,८४,०९८

वरील सर्व वयोगटातील एकूण मतदार ९,४०,५५,२१७ असून दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९,०३,०२,०६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. नव्याने होणाऱ्या या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik News: नाशकात भाजप-ठाकरे गट आमने-सामने, फरांदे आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

HSC Result Update | या वेबसाईटवर 12 वी निकाल पहायला मिळेल!

Lok Sabha Election 2024 : जे मतदान केंद्रावर ६ पर्यंत उपस्थित, त्या सर्वांना बजावता येणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT