friendship bonds
friendship bonds  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आपली मैत्री आपल्यापासून दूरावत तर नाही ना !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मैत्री हे असे नाते आहे ते आपण स्वत: कमावतो. मग ही मैत्री अल्लड वयातील असू देत किंवा वयोवृध्दातली असू देत त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खास असते.

हे देखील पहा -

मैत्रीचे नाते खूप खास असते. यात अनेक भावभावना जोडलेल्या असतात. मैत्री आपल्या आयुष्यातील असे एकमेव नाते जे सुंदर आणि महत्त्वाचे असते. आपल्या सगळ्या सुखदुखाचा साक्षीदार ही केवळ मैत्रीच असते. आपल्याला ज्या व्यक्तीची कंपनी अधिक आवडू लागते किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जिव्हाळा निर्माण होतो अशा प्रत्येक व्यक्तीसोबत आपली मैत्री जमू लागते. सर्वात चांगले व जवळचे मित्र हे खूप कमी असतात परंतु, कधी कधी आपण ज्याला आपला मित्र मानतो ती व्यक्ती आपल्याला मित्र मानत नसते किंवा त्या व्यक्तीला आपण आवडत नसतो. अशा मित्राचे वर्णन कसे ओळखाल हे जाणून घेऊया

१. आपल्या मित्राला (Friends) आपण आवडत नसू तर तो आपल्याला सोबत वेळ (Time) घालवणार नाही किंवा आपल्याला भेटण्यासाठी तो सतत टाळाटाळ अथवा काही तरी कारणे देईल. त्यांना आपल्या कोणत्याही गोष्टीत रस नसेल.

२. एक चांगला मित्र आपल्या चुकीबद्दल दोष देतो आणि त्याला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. परंतु, आपला मित्र आपल्या चुकीच्या गोष्टीला किंवा वागणुकीला प्रोत्साहन देत असेल तर आपण नक्कीच त्या गोष्टीवर विचार करायला हवा. आपल्या अपेक्षा भंग झाल्यामुळे आपला आत्मविश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल अशा मित्रांपासून वेळीच सावध रहा.

३. दोन चांगले मित्र एकमेकांची गुपिते तिसऱ्या व्यक्तीला कधीच सांगत नाहीत. परंतु ज्या व्यक्तीसोबत आपण मैत्री केली आहे ती आपले गुपित तिसऱ्या व्यक्तीला सांगत असेल तर वेळीच विचार करा. ते आपले गुपित इतर लोकांसोबत शेअर करातात किंवा अशावेळी आपली चेष्टा करतात.

४. दोन चांगले मित्र आपल्या प्रत्येक अडचणी फोनवर किंवा वेळोवेळी भेटून ऐकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपल्या मित्राला आपण डोकेदुखी वाटत असू किंवा तो आपल्या गोष्टींना टाळत असेल तर वेळीच विचार करा व अशा लोकांपासून दूर रहा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

Bacchu Kadu : देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे : बच्चू कडू

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

SCROLL FOR NEXT