मुंबई : वयोमानानुसार प्रत्येकांचा मनात आपल्या जोडीदाराची एक इमेज बनते. सिनेमा, मनोरंजनात दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराला त्याप्रमाणे गृहीत धरु लागतो.
हे देखील पहा -
लग्न (Marriage) करण्याची इच्छा असलेले किंवा नसलेले सर्वचजण 'परफेक्ट पार्टनर' शोधण्यासाठी सतत धडपड करत असतात. आपल्यापैकी कोणीच परफ्केट नसतो तरी देखील आपल्या जोडीदाराच्या बाबतीत आपण तर्क वितर्क लावून मोकळे होतो. आपण ठरवलेल्या मोजमापात जर आपला जोडीदार बसत नसेल तर आपण नाराज होतो. जोडीदार शोधताना आपण कुठेतरी जुळवून घ्यायला हवे. जोडीदाराबद्दल विचार करताना कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्याल हे जाणून घेऊया.
१. आपल्या जोडीदाराबद्दल आपल्या मनात एक वेगळी इमेज तयार होते. त्यासाठी आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आपण आपल्या विचारांना जुळवून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. विचार जुळत नसले की, आपली चिडचिड होऊन ते नातं नकारात्मकतेकडे पोहोचते त्यासाठी असे करु नका. समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या व त्यावर विचार करण्याचा प्रयत्न करा.
२. आपण भेटलेल्या व्यक्तीबद्दल सकारात्मक विचार करताना बरेच वेळा काही गोष्टी ह्या अस्पष्ट असतात. त्यामुळे कुठेतरी ट्रायल अँड एरर या पध्दतीला भर दिली जाते. तेव्हा एकजण नात्यात अडकतो तर दुसरा त्या नात्यात चान्स घेऊ पाहत असतो. त्यामुळे नातं अधिक गुंतागुंतीचे होते.
३. आपल्या मनात असणाऱ्या जोडीदाराच्या विचाराबद्दल हेका धरणे चुकीचे आहे. आपल्या परफेक्ट जोडीदार मिळेल हे गणित चुकीचे आहे. जोडीदाराबद्दल विचार करताना आपण आपल्या पुढच्या गोष्टींचाही विचार करायला हवा. विचाराच्या चौकटीत अडकून राहू नका.
४. जोडीदार निवडताना आपल्या विचारात व वागण्यात बदल करणे गरजेचे आहे. आपण करत असलेला विचार हा कितपत योग्य आहे त्याची पुनर्तपासणी करा. त्यामुळे आपल्याला मनासारखा जोडीदार निवडण्यास मदत होईल.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.