Success Mantra  Saam Tv
लाईफस्टाईल

Success Mantra : चल मन सँभाल कर, लक्ष्य लगा आकाश पर... शांत मनाने काम केल्यास अनेक कठीण प्रसंगावर देता येते मात !

Life Lesson : माणसाच्या चंचल मनापेक्षा काहीही नाही. मनावर ताबा असल्यास सर्व काही सहज साध्य करता येते.

कोमल दामुद्रे

Patience Tips Marathi : असे म्हटले जाते की, मन स्थिर नसले तर सोपे कामही अवघड वाटू लागते. माणसाच्या चंचल मनापेक्षा काहीही नाही. मनावर ताबा असल्यास सर्व काही सहज साध्य करता येते.

बहुतेक लोकांचा कठीण प्रसंग असल्यास त्यांचा संयम सुटतो, त्यांचे मन अस्वस्थ होते, त्यामुळे त्यांचे काम बिघडते. रागाने भरलेले मन अनेकदा विनाशासाठी कारक ठरते. म्हणून प्रयत्न करा की परिस्थिती कितीही कठीण (Difficult) असली तरी मनात संयम आणि शांतता ठेवा.

बहुधा माणूस रागाच्या भरात असा निर्णय घेतो, ज्याचा मन शांत झाल्यावर त्याला पश्चाताप होतो. पण तोपर्यंत परिस्थिती बिघडते. यानंतर तुम्ही कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी त्यात सुधारणा करता येत नाही. म्हणूनच पश्चाताप करण्यापेक्षा मन शांत ठेवणे चांगले. याशी संबंधित काही प्रेरक वाक्ये जाणून घेऊया.

1. जर तुमचे मन जास्त चंचल असेल किंवा नेहमी चंचल असेल तर तुम्हाला कितीही चांगले गुरू किंवा संत मिळाले तरी त्यांनी दिलेल्या शिकवणीचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.

2. जीवनात सकारात्मक (Positive) राहण्यासाठी, ज्यांच्यासोबत तुम्हाला आनंद वाटतो किंवा त्यांच्या सहवासाचा तुमच्यावर परिणाम होतो अशा लोकांसोबत जास्त वेळ (Time) घालवण्याचा प्रयत्न करा.

3. कोणत्याही व्यक्तीचे मन तेव्हाच कळू शकते जेव्हा कोणी त्यांना प्रेमाने आणि सहानुभूतीने विचारले. असे मानले जाते की शांत मनाची व्यक्ती इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा म्हणून कार्य करते.

4. जो खेळात एकदा हरला तो पुन्हा जिंकू शकतो, पण जो पराभव स्वीकारतो त्याला कधीच यश मिळत नाही.

5. तुम्हाला तुमचे यश कधीच प्रत्यक्ष दिसणार नाही, कारण ते तुमच्या मनात घडते. ज्याने मन जिंकले आहे त्याला दुसरा कोणी पराभूत करू शकत नाही किंवा विजयासाठी तयारही करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT