Morning Breakfast
Morning Breakfast  Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Breakfast : आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर, नाश्ता करताना 'या' चुका कधीच करू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Morning Breakfast : दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी आपल्याला नाश्ता करणे फार गरजेचे असते. तुम्हाला दिवसभर काम करायला एनर्जी हवी असेल तर तुम्हाला सकाळचा नाष्टा करणे फार गरजेचे आहे.

सकाळचा नाश्ता हा तुमच्या शरीराचे आरोग्य (Health) चांगले ठेण्यासाठी मदत करतो. पण लोक नाष्टा करायच्या वेळी काही अशा चुका करतात. त्याचा विपरीत परीणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. चला तर मग पाहूया नाश्ता दरम्यान कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

सर्वात पहिली चूक म्हणजे आंघोळ न करणे. तुम्हाला आंघोळीच्या आधी नाश्ता करायची सवय असेल तर ती अत्यंत चुकीची सवय आहे. असं केल्याने तुमची पचनसंस्था खराब होते. असं केल्याने तुम्हाला अन्नपचण्यास समस्या उद्भवू शकते. आयुर्वेदानुसार तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम कमजोर पडू लागते. यामुळे यांना बसण्यास अडथळा निर्माण होतो. तुम्हाला ही सवय असेल तर लवकरात लवकर ही सवय सोडून द्या.

रोजच्या जीवनशैली (Lifestyle) मधील दुसरी चूक म्हणजे उशिरा नाश्ता करणे. उशिरा नाश्ता केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत तुम्हाला नाश्ता करून घ्यायला पाहिजे.

सकाळी नऊच्या आधी नाश्ता केल्याने तुमचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. सकाळच्या प्रहारी लवकर नाश्ता केल्याने तुम्ही दिवसभर स्ट्रेस फ्री राहता. ब्रेकफास्ट आणि डिनरमध्ये तब्बल 12 तासांचा कालावधी असला पाहिजे.

सर्वात महत्त्वाची आणि तिसरी चूक म्हणजे नाष्टा न करणे. बरेच लोक सकाळी काहीच खात नाहीत. कामाच्या घाईमुळे किंवा भूक नसल्यामुळे सकाळचा नाष्टा स्किप करतात. परंतु असं केल्याने तुम्हाला दुसऱ्या टाईपचा डायबिटीज त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढू शकते.

सकाळचा नाश्ता स्किप केल्याने तुमच्या शरीरातील मेटाबोलिजमची गती कमी होते. त्याचबरोबर नाश्ता कमी प्रमाणात करणे ही सुद्धा एक चूक आहे. तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये पोषक तत्वे असतील.

नाश्ता करताना दूध, दही, ड्रायफूट अशा हेल्दी आणि प्रोटीनयुक्त नाष्ट्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर हेल्दी ब्रेकफास्टमुळे तुमचा मुड चांगला राहतो आणि तुमचा दिवस सुध्दा छान जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health Tips: उन्हाळा 'या' पद्धतीनं घ्या आरोग्याची काळजी

Maval Lok Sabha: अवकाळी पावसानं मतदानावर फेरलं पाणी; फेरमतदानाची मागणी

S. Jaishankar: लोकसभा निवडणुकीत विदेशी संस्थांचा हस्तक्षेप, परराष्ट्र मंत्री स्पष्टच बोलले; 'वॉर रुकवा दी पापा'वरील टीकेलाही कडक उत्तर

Special Report : त्या 45 मिनीटांनी बारामतीचं वारं फिरणार? स्ट्रॉंगरुमचे कॅमेरे बंद! आत घडलं तरी काय?

Special Report : मुख्यमंत्र्यांनी बॅगेत काय आणलं? संजय राऊत यांच्या आरोपामुळे एकच खळबळ

SCROLL FOR NEXT