Skin Care Tips
Skin Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : त्वचेवरील सौंदर्य हरवले? तर हळदीचे उटणे वापरून पाहा

कोमल दामुद्रे

Beauty Tips : फार पूर्वीपासून हळदीचा वापर सौंदर्यासाठी केला जातो. अनेक कॉस्मेटिक कंपन्या आजही त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये हळदीचा वापर करतात. खरेतर हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.

तसेच हळद (Turmeric) चेहऱ्यावरील काळे डाग, लालसरपणा, पिंपल्स दूर करण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळेच जर तुम्ही हळदीचा वापर उठणे म्हणून केला तर पूर्ण शरीर ग्लो करेल. शरीराच्या त्वचेवरील (Skin) काळेपणा दूर करून त्वचेला पॉलिश करण्याचे काम हळद करते. म्हणून दररोज आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करू शकता, चला तर मग जाणून घेऊया हळदीपासून उटणे बनवण्याच्या 2 पद्धती.

1. हळद आणि बेसनपासून उटणे

  • गुलाब जल – अर्धा कप

  • हळद आणि बेसन – अर्धा कप

  • दूध – अर्धा कप

पद्धत

एका मोठ्या बाऊलमध्ये हळद, बेसन, दूध (Milk) आणि गुलाब जल या सर्व गोष्टी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे उटणे तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या शरीरावर हलक्या हाताने लावा आणि त्यानंतर हळूहळू मालिश करा. 10-15 मिनिटे मालिश केल्याने ते हळूहळू कोरडे होईल आणि त्वचेतून बाहेर पडू लागेल. जेव्हा ते पूर्णपणे काढून टाकाल तेव्हा सामान्य पाण्याने घासून आंघोळ करा. या उटण्याचा वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग आणि डाग कमी होतील. त्यासोबतच त्वचेला पोषणही मिळेल

2. हळद-चंदन उटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • चंदन – अर्धी वाटी

  • दूध – अर्धी वाटी

  • हळद – अर्धी वाटी

  • गुलाब जल – अर्धी वाटी

पद्धत

एका मोठ्या बाऊलमध्ये हळद चंदन पावडर दूध आणि गुलाब जल घालून सर्व चांगले मिक्स करून घ्या. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट पूर्ण शरीराला लावा आणि हलक्या हाताने हळूहळू मालिश करा. 10 ते 15 मिनिटांत सर्व लेप त्वचेतून बाहेर पडण्यास सुरुवात होईल. संपूर्ण लेप गळून निघून गेल्यावर सामान्य पाण्याने घासून आंघोळ करावी.

3. हे दोन्ही उटणे वापरण्याचे फायदे

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सर्व छिद्रे स्वच्छ होण्यासाठी हे उठणे फायदेशीर आहेत. एवढेच नाहीतर त्वचा सॉफ्ट आणि शाईन करण्यासाठी देखील हे उटणे उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही साबणा ऐवजी रोज या उटण्याचा वापर करून त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT