Eye cancer symptoms warning saam tv
लाईफस्टाईल

Eye cancer symptoms: ही लक्षणं दिसू लागली तर समजा डोळ्यांच्या कॅन्सरची होतेय सुरुवात; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Eye cancer symptoms warning: उद्या ४ फेब्रुवारी असून हा जागतिक कॅन्सर डे म्हणून पाळला जातो. डोळ्यांचा कॅन्सर हा दुर्मिळ आजार असला तरी त्याची लक्षणं वेळेत ओळखली नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आतापर्यंत तुम्ही पोट, लिव्हर, गर्भाशय या अवयवांच्या कॅन्सरबद्दल ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीये का की, डोळ्यांचाही कॅन्सर असतो. हा एक गंभीर पण दुर्मिळ आजार असून ज्याच्या सुरुवातीची लक्षणं अनेकदा किरकोळ वाटतात. जर त्याची लक्षणं लवकर ओळखली गेली तर उपचार करणं सोपं होतं.

डोळ्यांच्या तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डोळ्यांचा कॅन्सर लवकर ओळखला गेला नाही तर नाही तर त्याचा परिणाम केवळ डोळ्यांच्या दृष्टीवर नाही तर संबंधित व्यक्तीच्या जीवावरही होतो. सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणं सामान्य डोळ्यांच्या समस्यांसारखी असतात. ज्यामुळे लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात.

डोळ्यांच्या कॅन्सरची लक्षणं

  • दृष्टी कमी होणं

  • डोळ्यांमध्ये किंवा आजूबाजूला नवीन गाठ किंवा सूज येणं.

  • रंग ओळखण्यात अडचण येणं

  • डोळ्यांमध्ये सतत किंवा असह्य वेदना होणं.

  • फोटो काढताना डोळ्यांत पांढरा रंग चमकणं

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

डोळ्यांच्या कॅन्सरचा सर्वात मोठा धोका म्हणजे चुकीचं निदान किंवा उशिरा निदान होणं गरजेचं आहे. लोकं त्याला सामान्य डोकेदुखी, डोळ्यांचा थकवा किंवा जास्त स्क्रीन पाहण्याचे परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात तेव्हा हा आजार पसरतो. उशिरा निदान केल्याने केवळ दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतोच, परंतु कॅन्सर डोळ्याच्या पलीकडे पसरू शकतो आणि शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन सभा, हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाड झाल्याने सभेला उशीर

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

Ajit Pawar Death : दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

Mumbai Road Trip: लोणावळा-खंडाळा झाले जुने; मुंबईजवळची 8 हिडन ठिकाणं पाहून थक्क व्हाल, पार्टनसोबत रोड ट्रिप करा एन्जॉय

Methi Thalipeeth: मुलांच्या नाश्त्यासाठी खरा खमंग मेथी थालीपीठ, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT