Leg symptoms of heart problems saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Swelling in legs heart disease warning: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेकदा केवळ छातीत वेदना होते, असे मानले जाते, पण हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक समस्या शरीराच्या इतर भागांत, विशेषत: पायांमध्ये, संकेत देऊ लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

पायांमध्ये सतत वेदना होणं किंवा पायांचे मसल्स पेन होणं हे काहीवेळा सामान्य नसू शकतं. नुकत्याच करण्यात संशोधनातून असं स्पष्ट झालंय की, पायांमधील काही विशिष्ट लक्षणं ही धमन्यांमधील अडथळ्यांचे संकेत मानले जातात. त्यांचा थेट संबंध हार्टशी जोडला जातो.

‘सर्क्युलेशन’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात १४,००० पेक्षा अधिक पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असलेल्या रुग्णांचा मागोवा घेण्यात आला. या अभ्यासात असं दिसून आलं की, पायांच्या धमन्यांमध्ये अडथळा असलेल्या रुग्णांमध्ये पुढील ३० महिन्यांत हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या अधिक होता.

पायांमधील लक्षणं हृदयाच्या आरोग्यासाठी का महत्त्वाची?

पायांमधील धमन्या अरुंद असतील तर त्याच अ‍ॅथेरोस्क्लेरोटिक प्रक्रियेमुळे हृदयाच्या कोरोनरी धमन्यांवरही परिणाम होतो. चालताना पायांमध्ये वेदना, जडपणा, आकडी किंवा अशक्तपणा जाणवणं हे ‘इंटरमिटंट क्लॉडिकेशन’ चं लक्षण असतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या माहितीनुसार PAD ही स्थितीचं अनेकदा निदान होत नाही. मात्र या स्थितीचा हृदयविकाराशी संबंधित धोका आधी हृदयविकार झालेल्या व्यक्तीइतकाच गंभीर असतो.

पायांमध्ये वेदना, बधिरता किंवा जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणं ही लक्षणं दुर्लक्षित न करता तात्काळ वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. ही लक्षणं शरीरातील व्यापक रक्तवाहिन्यांच्या समस्यांचे स्पष्ट संकेत असू शकतात.

पायांमधून दिसणारी हृदयविकाराची सामान्य लक्षणं

  • चालताना पायाच्या मांडीकिंवा नितंबांमध्ये वेदना होणं. या वेदना विश्रांती घेतल्यावर कमी होतात.

  • एका पायाच्या तुलनेत दुसऱ्या पायाच्या बोटांमध्ये थंडी, बधिरता किंवा निळसरपणा जाणवणं.

  • पायांवरील जखमा किंवा अल्सर बरं होण्यास वेळ लागणं, त्वचा पातळ किंवा चमकदार दिसणे, केस गळणे.

  • पाय किंवा टाचांमध्ये नाडीची स्पंदन कमी होणं.

  • पाय किंवा टाचांमध्ये सूज येणं

पायांमधील वेदना आणि हृदयविकार यामधील वैज्ञानिक संबंध

पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होणं हे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आजाराचं लक्षण असतं. हीच प्रक्रिया हृदयावरही परिणाम करते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. पायांमधील लक्षणं हा एक प्रकारचा इशारा असतो. या लक्षणांकडे वेळेवर लक्ष दिल्यास गंभीर हृदयविकार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.

पायांमध्ये ही लक्षणं दिसल्यास काय करावं?

  • पायांमध्ये सातत्याने वेदना, रंग बदल किंवा जखमा बऱ्या होण्यास विलंब होत असल्यास दुर्लक्ष करू नका.

  • डॉक्टरांकडून ‘अ‍ॅंकल-ब्रेकियल इंडेक्स’ (ABI) चाचणीची मागणी करा, जी टाच आणि हातातील रक्तदाबाची तुलना करून पायांच्या धमन्यांची स्थिती दर्शवते.

  • धूम्रपान सोडा, नियमित व्यायाम करणं आणि संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळांनी युक्त संतुलित आहार घेणं हे जोखीम घटक कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • मधुमेह असल्यास रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवा.

  • डॉक्टरांशी सल्लामसलत करून स्टॅटिन्स किंवा अँटीप्लेटलेट औषधांचा वापर योग्य आहे का हे ठरवा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

Thursday Horoscope : खर्चाचा हिशोब लागणार नाही; मिथुनसह ५ राशींच्या लोकांचा जवळच्या लोकांकडून घात होण्याची शक्यता

Shocking: प्रेमाचा भयंकर शेवट! ४ मुलांची आई असलेल्या वहिनीच्या प्रेमात झाला पागल, भांडणानंतर २५ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

Maharashtra Politics: दोंडाईचामध्ये डाव साधला; शरद पवार गटात खिंडार, तीन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बिबट्यानं थांबवली शेकडो लग्न, लग्नाळूसमोर बिबट्याचं विघ्न

SCROLL FOR NEXT