Symptoms of liver cancer saam tv
लाईफस्टाईल

Early signs of liver cancer: शरीरात 'हे' 6 बदल दिसले तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय; तातडीने डॉक्टरांकडे जा

Symptoms of liver cancer: जेव्हा यकृताच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा यकृताचा कर्करोग होतो. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे ओळखणे थोडे कठीण असू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

  • लिव्हर कॅन्सरची लक्षणे शरीराद्वारे दिली जातात.

  • पोटाच्या उजव्या बाजूला वेदना गंभीर इशारा आहे.

  • विनाकारण वजन कमी होणे लिव्हर आजाराचे लक्षण आहे.

आपलं शरीर अनेकदा गंभीर आजार येण्यापूर्वी त्याचे संकेत देतं. आपण ते ओळखून दुर्लक्ष न करता वेळेत लक्ष दिलं. तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. लिव्हरचा कॅन्सर म्हणजेच यकृताचा कॅन्सर हा असाच एक धोकादायक आजार आहे, जो सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर उपचाराची शक्यता खूप वाढते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लिव्हरचं काम शरीरातील रक्त शुद्ध करणं आणि पचन व्यवस्थित ठेवणं असतं. पण ज्यावेळी यकृताचं कार्य बिघडते, तेव्हा शरीर काही तुम्हाला काही इशारे देत असतं. शरीरातील हे बदल वेळेत ओळखणं फार गरजेचं आहे.

पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना

लिव्हर पोटाच्या उजव्या भागात असतो. त्यात समस्या आल्यावर त्या भागात वेदना किंवा जडपणा जाणवतो. जर हा त्रास सतत राहिला किंवा वाढू लागला तर तो लिव्हर कॅन्सरचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.

विनाकारण वजन कमी होणं

जर तुम्ही डाएट किंवा व्यायाम न करता देखील अचानक वजन कमी होऊ लागलं तर ते लिव्हरच्या आजाराचं लक्षण असू शकतं. कॅन्सरमुळे शरीराची ऊर्जा झपाट्याने कमी होते आणि वजनात घट होऊ लागते.

भूक कमी होणं

लिव्हरची तब्येत बिघडल्यावर पचनावर परिणाम होतो. त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते. थोडं खाल्ल्यावर लगेच पोट भरल्यासारखं वाटणं हेही लिव्हर कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

डोळे आणि त्वचा पिवळसर होणं

लिव्हर नीट काम न केल्यास शरीरात बिलीरुबिनची पातळी वाढते ज्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळे पडतात. अचानक पिवळ्या कावीळीसारखी लक्षणं दिसली आणि ती बरी झाली नाहीत, तर ती गंभीर लक्षणं आहेत.

सतत थकवा

लिव्हर कॅन्सरमुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे नेहमी थकवा, अशक्तपणा आणि सुस्ती जाणवते. हा थकवा विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही.

पोटात सूज येणं

लिव्हरमध्ये गाठ होणं किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाल्याने पोटात पाणी साचतं. त्यामुळे पोट फुगतं आणि सूज येऊ लागते. हे लिव्हर कॅन्सरचं गंभीर लक्षण आहे आणि तात्काळ उपचारांची गरज असते.

लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे महत्त्वाचे लक्षण कोणते?

पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण आहे.

विनाकारण वजन कमी होण्याचे कारण काय असू शकते?

लिव्हर कॅन्सरमुळे ऊर्जा कमी होऊन वजन कमी होते.

लिव्हरची तब्येत बिघडल्यावर भूकेवर काय परिणाम होतो?

पचनविकारामुळे भूक कमी होते आणि पोट भरल्यासारखे वाटते.

डोळे आणि त्वचा पिवळसर का होतात?

लिव्हर नीट काम न केल्याने बिलीरुबिनची पातळी वाढते, त्यामुळे पिवळेपणा येतो.

पोटात सूज येण्याचे मुख्य कारण काय आहे?

लिव्हरच्या कार्यात घसरण झाल्याने पोटात पाणी साचते आणि सूज येते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT