Body changes diabetes saam tv
लाईफस्टाईल

Early signs of diabetes: शरीरात 'हे' ५ मोठे बदल दिसले तर समजा डायबेटीज झालाय; लक्षणं पाहून दुर्लक्ष करू नका

Body changes diabetes: मधुमेहामध्ये, शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर त्याचा थेट परिणाम किडनी, हृदय, डोळे आणि नसांवर होतो, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारतात मधुमेहाचा प्रसार वेगाने वाढत आहे.

  • सतत तहान लागणे हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण आहे.

  • वारंवार लघवी होणे डायबिटीजचा संभाव्य संकेत आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत डायबेटीज हा एक अत्यंत गंभीर ठरणारा आजार आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या आजाराचा प्रसार वेगाने वाढतोय. इपिडेमिओलॉजी ऑफ टाइप २ डायबिटीज इन इंडिया या २०२१ सालच्या अभ्यासानुसार, भारतात सुमारे ७७ दशलक्ष लोकं मधुमेहाने ग्रस्त आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा आकडा २०३० पर्यंत १०१ दशलक्ष आणि २०४५ पर्यंत तब्बल १३४ दशलक्षपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधुमेह वेळीच ओळखणं आणि त्यावर उपाय करणं आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

मधुमेह म्हणजे काय?

डायबिटीज किंवा मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे ज्यामध्ये शरीरातील साखरेवर नियंत्रण राहत नाही. ग्लुकोज हे शरीरासाठी उर्जेचं मुख्य स्रोत असतं. टाइप २ डायबिटीजची लक्षणं खूप सूक्ष्म असतात. त्यामुळे लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

सतत तहान लागणं

तुम्ही भरपूर पाणी प्यायलात तरीही सतत तहान लागते का? जर हो तर हे मधुमेहाचं एक सुरुवातीचं लक्षण असू शकतं. रक्तातील साखर खूप वाढली की, शरीरातील पेशींमधून द्रव बाहेर पडतो. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होतं. यामुळे शरीर पुन्हा पुन्हा पाणी प्यायला भाग पाडतं. विशेषतः रात्रीच्या वेळेस ही तहान अधिक जाणवते.

सतत लघवी होणं

जर तुम्हाला वारंवार लघवीसाठी जावं लागतंय का? विशेषतः रात्री झोपमोड होते का? हे देखील डायबिटीजचं लक्षण असू शकतं. रक्तातील साखर वाढली की किडनी ती साखर युरीनमार्फत बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे लघवी वारंवार होते.

अचानक वजन कमी होणं

कोणतंही डाएट किंवा व्यायाम न करता जर तुमचं वजन कमी होतं असेल तर ते धोक्याचं संकेत असू शकतं. ज्यावेळी शरीरात पुरेशी साखर पेशींमध्ये पोहोचत नाही तेव्हा शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायू आणि फॅट्सचा वापर करतं. त्यामुळे अचानक वजन कमी होऊ लागतं.

थकवा आणि अशक्तपणा

जर तुम्ही दिवसभर झोप घेऊनही थकलेले असाल किंवा सुस्त वाटत असाल तर याकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेहामुळे शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे सतत अशक्तपणा जाणवतो. ही थकवा केवळ झोप घेऊन किंवा कॉफी प्यायल्याने दूर होत नाही.

जखम भरण्यास वेळ लागणं

जर एखादी छोटीशी जखम किंवा खरचटणं बरं होण्यासाठी बराच काळ लागत असेल किंवा हळूहळू ती अधिक गंभीर होतेय तर ते मधुमेहाचं लक्षण असू शकतं. मधुमेहामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

मधुमेह म्हणजे काय?

मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही आणि इन्सुलिनचे कार्य बिघडते.

सतत तहान लागण्याचे कारण काय?

रक्तातील साखर जास्त झाल्यामुळे पेशींमधून द्रवपदार्थ बाहेर पडतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होते आणि शरीराला सतत पाणी प्यायची भावना वाटते.

वारंवार लघवी होणे का धोकादायक आहे?

रक्तातील अतिरिक्त साखर किडनी युरीनद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे लघवी वारंवार होते, विशेषतः रात्री.

अचानक वजन कमी होण्याचे कारण काय?

मधुमेहामुळे शरीरातील पेशींना ग्लुकोज मिळत नाही, त्यामुळे शरीर स्नायू आणि चरबीचा ऊर्जेसाठी वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होतं.

जखम वेळेवर भरून न येण्याचे कारण काय?

मधुमेहामुळे रक्ताभिसरण आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे जखम धीम्या गतीने भरतात किंवा बरे होण्यास विलंब होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT