Heart Attack Signs Saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: ही 4 ‘साइलेंट’ लक्षणं दिसली तर तत्काळ सावध व्हा; हार्ट अटॅकची सुरूवात असू शकते

heart attack silent symptoms: हृदयविकाराचा झटका अचानक येतो असे अनेकांना वाटते. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही शांत लक्षणे आधी दिसतात. ही लक्षणे ओळखली नाहीत तर मोठा धोका संभवतो.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचं प्रमुख कारण ठरतो. यावेळी दरवर्षी लाखो लोकांना याचा फटका बसतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्याची लक्षणं काही आपल्या शरीरात दिसून येतात. विशेषतः महिलांमध्ये सुरुवातीचे संकेत सूक्ष्म असतात. यामध्ये थकवा, ताण किंवा अपचन यांसारख्या सामान्य तक्रारींमुळे गोंधळ उडतो. हे लपलेले संकेत ओळखणं गंभीर नुकसान टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

छातीत दडपण किंवा अस्वस्थता

हृदयविकाराचा झटका येण्याचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दडपण किंवा वेदना. ही भावना छातीच्या मध्यभागी दाब, जडपणासारखी वाटते. हे लक्षण सर्वांना माहिती असलं तरीही त्याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. काही वेळा ते इतके सौम्य असतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करून त्याला थकवा समजतात.

श्वास घेण्यास त्रास

छातीत वेदना नसतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अचानक श्वास घेण्यात अडचण येणं, विशेषतः अनपेक्षित थकवा किंवा गरगरणं यांसोबत असेल तर ते गंभीर इशारा असू शकतो. हे लक्षण किरकोळ वाटल्यामुळे अनेक महिला त्याकडे दुर्लक्ष करतात.

थंड घाम, मळमळ किंवा गरगरणे

अचानक थंड घाम येणं, मळमळणं किंवा गरगरणं ही लक्षणं फ्लूसारखी वाटू शकतात. पण ती हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषतः अनपेक्षित थकवा आणि चिंता महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात. वेळेवर त्यांची दखल घेतल्यास गंभीर समस्या टाळता येतात.

हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो ज्यावेळी हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह थांबतो. मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, कोरोनरी धमन्यांमध्ये चरबीचा थर हळूहळू साचतात, याला अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. जर हा थर फुटला तर रक्ताची गुठळी तयार होते आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होतं. लक्षणं वेळेवर ओळखणं आणि त्वरित वैद्यकीय उपचार घेणं हे गंभीर इजा किंवा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या माहितीनुसार, अमेरिकेत ६० दशलक्षांहून अधिक महिला हृदयविकाराने ग्रस्त आहेत. २०२३ मध्ये हृदयविकारामुळे ३,०४,९७० महिलांचा मृत्यू झाला. तरीही केवळ ५६% महिलांना हृदयविकार हे त्यांचं प्रमुख मृत्यूचं कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियानं वनडे मालिका खिशात घातली; आयसीसीनं अख्ख्या भारतीय संघाच्या खिशात हात घातला

Mumbai Metro 8: मुंबई, मानखुर्द ते पनवेल, 11 स्थानकं कोणती? कसा असेल मुंबई-नवी मुंबई जोडणारा मेट्रो ८ चा प्रोजेक्ट?

Maharashtra Tourism : धुक्याची चादर अन् दाट जंगल; विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन, हिवाळ्यात नक्की जा

पुण्यात अपघाताचा थरार; नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा भीषण अपघात

Maharashtra Politics: महायुतीत फोडाफोडी बंद, पण 'ठणाठणी' सुरूच; कल्याण-डोंबिवलीतलं राजकारण पुन्हा तापलं

SCROLL FOR NEXT