Marriage ending signs saam tv
लाईफस्टाईल

Marriage ending signs: वैवाहिक जीवनात ४ संकेत दिसले तर समजा नातं तुटण्याच्या मार्गावर आहे; वेळीच चुका सुधारा

Signs of a broken marriage : विवाह म्हणजे दोन व्यक्तींच्या भावना, विचार आणि जीवनाचं एकत्र येणं. सुरुवातीला गोड वाटणारा हा प्रवास, काळाच्या ओघात संवादाअभावी किंवा समजुतीतल्या कमतरतेमुळे नाजूक बनतो.

Surabhi Jayashree Jagdish

लग्नाला अनेकदा दोन मनांचं कुटुंबांचं मिलन म्हटलं जातं. हे एक बंधन आहे जे प्रेम, विश्वास आणि समजुतीवर आधारित असतं. कालांतराने अनेक नात्यांमध्ये तो गोडवा राहत नाही. हळूहळू त्यात तडे जाऊ लागतात. बहुतेकदा ही चिन्हं इतकी लहान असतात की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ही चिन्हं हळूहळू नातं आतून पोकळ बनवतात. अखेर नातं तोडण्याशिवाय कोणता पर्याय उरत नाही.

जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात असे काही संकेत दिसत असले तर समजून घ्या की तुमचं वैवाहिक जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. जर ही चिन्हं वेळीच ओळखली गेली आणि सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले तर नातं वाचवता येतं. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

संभाषणात अभाव

जेव्हा पती-पत्नीमधील संभाषणाची जागा वादविवाद, टोमणे आणि शांतता घेऊ लागतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असते. नातेसंबंधांमध्ये, विचारांची देवाणघेवाण होते, परंतु जेव्हा बोलणं ओझं वाटू लागतं किंवा प्रत्येक संभाषण वादात बदलतें, तेव्हा ते नातेसंबंध बिघडण्याचे लक्षण असतं.

इमोशनल दूरावा

नातेसंबंधात जवळीक ही केवळ शारीरिकच नाही तर भावनिक जोड देखील महत्त्वाची असते. जर तुमच्यात जवळीक नसेल किंवा नवरा-बायको मनापासून बोलत नसतील तर तर हे अंतर हळूहळू नातं संपवू शकतं.

संशय

लग्नाचा पाया विश्वासावर उभा असतो. जर तुम्ही एकमेकांवर संशय घेत असाल किंवा वारंवार खोटं बोलू लागला असाल तर हे तुमचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.

भविष्याचं प्लानिंग

जर तुम्ही दोघेही मिळून भविष्यातील कोणतंही नियोजन करत नसाल, ना मुलांचं शिक्षण, ना घराचं नियोजन, ना सुट्टीचे नियोजन तर हे देखील नातं तुटण्याचं लक्षण असू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ भागातून भाजपला खिंडार

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

SCROLL FOR NEXT