Kidney Disease Symptoms google
लाईफस्टाईल

Kidney Disease: डोळ्यांमध्ये ही लक्षणं दिसली तर समजा किडनी होतेय निकामी; तज्ज्ञांनी दिली माहिती

Eye Symptoms Of Kidney Disease: तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डोळ्यांमध्ये काही विशिष्ट लक्षणं दिसल्यास ते किडनीच्या आजाराशी संबंधित असू शकतं. यावेळी कोणती लक्षणं दिसतात ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

असं म्हणतात तुमचे डोळे तुमच्या आरोग्याची माहिती देत असतात. त्याचप्रमाणे किडनीमध्ये कोणत्याही समस्या आल्या तर डोळे त्याची माहिती देत असतात. ज्यावेळी किडनीच्या कार्यात कोणताही बिघाड होतो तेव्हा डोळ्यांवर त्याचे परिणाम दिसून येतात.

बहुतेक लोक किडनीच्या समस्या उद्भवल्या की, तुमच्या पायाला सूज येते किंवा सतत थकवा येऊ लागतो. परंतु काही महत्त्वाची लक्षणं ही तुमच्या डोळ्यांमध्येही दिसून येतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर ही लक्षणं लवकर ओळखली गेली तर गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.

पापण्यांना हलकीशी सूज

सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज येणं हे किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असतं. ज्यावेळी किडनी प्रोटीन फिल्टर करू शकत नाहीत तेव्हा शरीरात द्रव जमा होण्यास सुरुवात होते. ज्याचा पहिल्यांदा डोळ्यांच्या नाजूक भागावर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांना सूज येते.

नजर धूसर होणं

किडनीच्या आजारामुळे निर्माण होणाऱ्या समस्या उच्च रक्तदाब किंवा वाढलेली रक्तातील साखरेची पातळी या दोन्ही गोष्टी रेटिनातील बारीक नसांना नुकसान पोहोचवात. ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ लागते. हा बदल अनेकदा हळूहळू होतो. त्यामुळे नियमित डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे.

डोळे कोरडे पडणं

जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा शरीरात टॉक्सिन पदार्थ जमा होतात. यामुळे अश्रू निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. यामुळे डोळ्यांत कोरडेपणा, जळजळ किंवा खाज सुटण्याची भावना निर्माण होते. अशावेळी भरपूर पाणी पिणं, डोळ्यांसाठी ड्रॉर्स वापरणं महत्वाचं आहे.

डोळ्यांमध्ये लाल ठिपके दिसणं

डोळ्यांमध्ये जास्त लाल ठिपके दिसणं किंवा सतत लालसरपणा येणं हे हाय ब्लड प्रेशर किंवा टॉक्सिन पदार्थ जमा झाल्यामुळे होऊ शकतं. हे बहुतेकदा किडनीच्या गंभीर आजाराशी संबंधित असतं.

डोळे पिवळसर दिसणं

किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात युरियासारखे टॉक्सिन पदार्थ जमा झाले किंवा यकृतावर परिणाम झाला तर डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू शकतो. ही स्थिती गंभीर मानली जाते. अशावेळी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घाटातून जाताना भरधाव बस रस्त्यावर उलटली; पाच महिन्याच्या बाळासह ५ प्रवाशांचा मृत्यू

धुळवडीच्या दिवशी नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतलं; आजीविरोधात पोलिसांत गुन्हा

Saturday Horoscope : शनीची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांना साडेसातीमध्ये मिळणार मोठा दिलासा

मुंबईत पाणीबाणी! ऐन उन्हाळ्यात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार, नेमकं कोणत्या भागात?

पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? कुणबी नोंदीवरुन संघर्षाची ठिणगी?

SCROLL FOR NEXT