Early signs of bone cancer SAAM TV
लाईफस्टाईल

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

Early signs of bone cancer: हाडांमध्ये सतत वेदना, सूज किंवा गाठ दिसणं ही हाडांच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. वेळेत निदान झाल्यास उपचार सोपे होतात.

Surabhi Jayashree Jagdish

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार जडतात. अयोग्य आहार आणि जीवनशैलीमुळे कॅन्सरच्या प्रमाणात देखील वाढ झालीये. यामध्ये तरूणांना हाडांच्या कॅन्सरचं निदान होत असल्याचं समोर आलं आहे. जर याचं वेळेत निदान झालं तर त्यावर उपचार करणं सोपं होतं.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं काय आहेत ती वेळीच ओळखणं गरजेचं आहे. जाणून घेऊया ही लक्षणं-

हाडांमध्ये सतत होणारी वेदना

जर तुमची हाडं सतत दुखत असतील तर ते हाडांच्या कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. सुरुवातीला या वेदना जास्त नसतात. मात्र कालांतराने त्यांचं दुखणं वाढतं. अशावेळी रूग्णांना व्यायाम केल्यानंतर अधिक प्रमाणात त्रास जाणवू शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

हाडाजवळ सूज किंवा गाठ

गाठ किंवा सूज हे प्रत्येक कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. जर तुम्हाला हाडांच्या आसपास सूज किंवा गाठ दिसून येत असेल तर ते एक महत्त्वाचं लक्षण असतं. अशावेळी त्या भागातील त्वचा लाल किंवा काही प्रमाणात गरम जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हाडं कमजोर होणं

कॅन्सरमुळे तुमची हाडं कमजोर होऊ लागतात. अशावेळी छोट्या किंवा किरकोळ दुखापतीमुळेही तुमचं हाड मोडण्याचा धोका असतो. जर तुम्हाला अशी परिस्थिती जाणवत असेल तर डॉक्टरांची वेळीच मदत घ्या.

सततचा थकवा

कॅन्सर कोणताही असो शरीराला त्या पेशींशी लढा देण्यासाठी अधिक उर्जा लागते. अशावेळी उर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला सततचा थकवा जाणवू शकतो. अशावेळी तुम्हाला अशक्त वाटू शकतं.

हालचाल करण्यात अडथळा येणं

हाडांचा कॅन्सर झालेल्या व्यक्तींना त्यांच्या हालचालीत बदल जाणवू शकतो. जर तुमच्या सांध्याजवळ कॅन्सर असेल तर हात किंवा पाय हलवताना त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांची सभा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची एंट्री, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

SCROLL FOR NEXT