Kidney problems: किडनीवर ताण येत असल्यास शरीरात दिसतात हे बदल; खराब होण्यापूर्वी तपासणी करून घ्या

Early signs of kidney damage: किडनीवर ताण आल्याची सुरुवातीची लक्षणं अनेकदा दुर्लक्षित राहतात. डोळ्यांखाली सूज, लघवीत बदल, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास ही गंभीर संकेत असू शकतात. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास किडनीचं आरोग्य चांगलं ठेवता येतं.
Early signs of kidney damage
Early signs of kidney damageSAAM TV
Published On

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र किडनी हा एक असा अवयव आहे ज्याच्या समस्या पटकन तुमच्या लक्षात येत नाही किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाच्या समस्या तर बर्‍याचदा लक्षातच येत नाहीत. शरीरातील रक्त स्वच्छ ठेवणं, टॉक्सिन पदार्थ बाहेर टाकणं आणि पाणी आणि मिनरल्सचं संतुलन राखणं ही किडनीची अत्यंत महत्त्वाची कामं आहेत.

किडनीवर ताण आला की तिच्या कार्यामध्ये बिघाड होऊ लागतो. तुमच्या किडनीवर जेव्हा ताण येतो तेव्हा काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं कोणती आहेत ती तज्ज्ञांनी सांगितली आहेत.

Early signs of kidney damage
Viral video: धक्कादायक! रील्स बघून मुलांनी बनवली जीवघेणी वस्तू; व्हिडिओ पाहून पालकही झाले हैराण

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, किडनीवर ताण आला की शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यामध्ये डोळ्यांच्या खाली सूज येणं, रात्री वारंवार लघवीला जाणं, लघवीत फेस दिसणं किंवा लघवीचा रंग जास्त पिवळा होणं अशी सुरुवातीची लक्षणं दिसून येतात.

डॉ. श्रीकांत अतलूरी यांनी एका वेबसाईटला माहिती देताना सांगितलं की, पुढे जाऊन ज्यावेळी हीच लक्षणं तीव्र स्वरूप घेतात तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. पायांना किंवा चेहऱ्यावर सूज येणं, सतत मळमळणं किंवा उलटीसारखं वाटणं, श्वास घेण्यास त्रास होणं, तसेच रक्तदाब सतत वाढलेला राहणं ही किडनीवर ताण येण्याची प्रमुख लक्षणं आहेत.

कोणत्या तपासण्या करू शकता?

सध्या किडनीशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे ही लक्षणं जाणून घेऊया याबाबत जागरूक राहण गरजेचं आहे. किडनीच्या आरोग्याची तपासणी करणंही सोपं आहे. रक्त तपासणीद्वारे क्रिएटिनिनचं प्रमाण तपासले जातं. याशिवाय तर लघवीच्या तपासणीतून प्रोटीनची पातळी समजू शकते. या साध्या चाचण्यांमुळे किडनीचं योग्य पद्धतीने सुरु आहे की नाही याची माहिती घेता येते.

Early signs of kidney damage
Screen time kids: वाढता स्क्रीन टाइम मुलांसाठी धोकादायक ठरतोय का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

डॉ. अतलूरी यांनी पुढे सांगितलं की, वेळेवर तपासणी करणं हेच किडनीचं आरोग्य उत्तम ठेवण्याचा एक मार्ग आहे. योग्य वेळी आजार ओळखला गेला, तर त्यावर नियंत्रण मिळवणं आणि उपचार करणं अधिक सोपं आहे.

Early signs of kidney damage
Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com