Early signs of heart problems saam tv
लाईफस्टाईल

Heart Damage Symptoms: ही ४ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय झालंय खराब; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

Early signs of heart problems: हार्ट अटॅक अचानक होतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो. मात्र, काही लक्षणं वेळेत ओळखल्यास मोठा धोका टाळता येतो. जर ही चार लक्षणं दिसली तर हृदयाचं नुकसान झालंय आहे असं समजावं.

Surabhi Jayashree Jagdish

ज्यावेळी आपल्या शरीराचा कोणताही अवयव डॅमेज म्हणजेच खराब होतो तेव्हा शरीर काही ना काही संकेत देत असतं. अनेकदा या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. जेव्हा शरीर सिग्नल देत असतं तेव्हा ते गंभीर आजारांचं लक्षण देखील असू शकतं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी महागात पडू शकतं.

जर तुम्ही वेळेवर लक्षणांकडे लक्ष दिलं आणि त्यामागील कारण शोधून काढली तर समस्येचं निदान वेळेत करता येतं. या आजारावर वेळेवर उपचार करता येतात आणि जीवही वाचवता येतो. आज आपण अशीच काही लक्षणं जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमचं हार्ट डॅमेज झाल्याचे संकेत देतात.

छातीमध्ये वेदना होणं

जर तुम्हाला छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे हृदयाच्या कोणत्याही समस्येचं लक्षण असू शकतं. त्यामुळे छातीत जळजळ आणि दाब येऊ शकतो. अशावेळी रूग्णाला छातीत जळजळ देखील होऊ शकते. अनेकदा हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढते. वेळेत उपचार न केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

जोरजोरात श्वास घेणं

पायऱ्या चढल्यानंतर किंवा जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर तुम्हीही जोरजोरात श्वास घेता का? असं असेल तर थोडं काम केल्यानंतर किंवा विश्रांती घेत असताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला कोणतंही काम न करताही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

हृदयाचे ठोके अनियमित होणं

जर तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित वाटत असतील तर ते हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. तुमच्या हृदयाचे ठोके अचानक फास्च किंवा काहीसे मंदावले असतील तर याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. हे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. या परिस्थितीत तुम्ही इलेक्ट्रोकार्डियोग्राम किंवा होल्टर मॉनिटर टेस्ट करून घेतली पाहिजे.

सतत ब्लड प्रेशर वाढणं

जर आपलं ब्लड प्रेशर सतत वाढत असेल आणि त्याला अनियंत्रित करणं कठीण होत असेल तर हे गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणूनही ओळखला जातो. हाय ब्लड प्रेशरमुळे कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही जास्त असतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Ajit Pawar Unseen Photos: अजित पवार यांचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो

Shocking : सोलापुरात सैराट! बहिणीबरोबर प्रेमविवाह केल्याने भाऊ संतापला, हॉटेलवर जेवायला बोलवून काटा काढला

SBI CBO Reruitment: स्टेट बँकेत नोकरी; २,२७३ पदांसाठी भरती; पगार मिळणार ८५,९२०; अर्ज कसा करावा?

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार, अर्थ - नियोजन खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

SCROLL FOR NEXT