Symptoms of Blood Cancer During Night Time saam tv
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: शरीरात हे ५ बदल दिसले तर समजा कॅन्सरची गाठ होतेय तयार; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Cancerous tumor body warning signs: कॅन्सर हा आजार वेळेत ओळखला गेला तर उपचार शक्य आहेत. मात्र शरीरात काही बदल दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्टरांच्या मते, शरीरात दिसणारे हे ५ बदल कॅन्सरजन्य गाठ तयार होत असल्याचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये जगभरात सुमारे १,९९७६,४९९ कॅन्सरच्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १०,३११,६१० पुरुषांची संख्या आहे तर ९,६६४,८८९ महिला असल्याची माहिती आहे.

२०२४ मध्येही विविध रिपोर्टसनुसार, जगभरात कॅन्सरसारखया गंभीर आजाराची १९ दशलक्षाहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. कॅन्सरचं वाढतं प्रमाण पाहता त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. यावेळी त्याची लक्षणं काय आहेत ती वेळेत ओळखली गेली पाहिजेत. कॅन्सरच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नयेत हे जाणून घेऊया.

सतत थकवा

सतत येणारा थकवा हे कॅन्सरचं एक असं लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं. व्यक्तीला येणारा हा थकवा साधा नसतो. यामध्ये चांगला आहार, विश्रांती घेतल्यानंतरही रूग्णाला बरं वाटत नाही.

अचानक वजन कमी होणं

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पोटाचा आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या ४० टक्के रूग्णांमध्ये वजनात घट दिसून येते. वजनामध्ये बदल हा ट्यूमरमुळे होणाऱ्या चयापचयातील बदलांमुळे होतो. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होतं.

सतत वेदना होणं

सततच्या वेदना होणं हे देखील कॅन्सरचं एक लक्षणं मानलं जातं. स्वादुपिंडाच्या किंवा ओव्हरच्या कॅन्सरमध्ये रूग्णाला पाठीत वेदना होत असतात. अनेकदा हाडांचं दुखणं हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षणं मानलं जातं.

त्वचेतील बदल

काही कॅन्सरची लक्षणं ही तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतात. यावेळी त्वचेवर तीळ येणं, जखमा लवकर न भरणं, त्वचेचा रंग बदलणं अशा समस्या दिसू लागतात.

शरीरावर गाठ येणं

शरीरामध्ये येणारी प्रत्येक गाठ ही धोकादायक असते असं नाही. पण काही गाठी या कॅन्सरचं लक्षण असू शकतात. ब्रेस्ट कॅन्सर किंवा टेस्टिकलचा कॅन्सर हा प्रामुख्याने गाठीद्वारे ओळखण्यात येतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Water Shortage : कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट, १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेस वंचितच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, जागा वाटपही ठरलं

Sunidhi Chauhan: हे काय होतं..? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानच्या डान्स मूव्ह्स बघून नेटकरी थक्क, म्हणाले...

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ, दिग्गजांना जमलं नाही ते सपकाळांनी करून दाखवलं

SCROLL FOR NEXT