How to hydrated your kids in summer season  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात मुलांना हायड्रेट ठेवताय तर; या गोष्टींची काळजी घ्या

उन्हाळ्यात मुलांना हायड्रेट ठेवण्यासाठी मुलांची अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या उन्हाळा सुरु झाल्यामुळे पालकांची (Parents) चिंता वाढली आहे. मुलांना (Child) उन्हाळी सुट्टी मिळाल्यामुळे त्यांना बाहेर अधिक खेळायला आवडते. तसेच पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत खूप काळजी घेत असतात. यादिवसात बहुतेक पालक आपल्या मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात अनेक आरोग्यदायी पेयांचा समावेश करण्यावर भर देतात. पण अनेक वेळा माहिती नसल्यामुळे मुलांना पेय देताना आपण काही सामान्य चुका करतो. याचा फटका मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. मुलांना पेय देण्यापूर्वी या चुका प्रकर्षाने टाळा.

हे देखील पहा -

शरीराला हायड्रेट ठेवणे हा उष्णतेपासून बचाव करण्याचा एकमेव उत्तम पर्याय आहे. यासाठी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळेच पालक मुलांना उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हायड्रेशन युक्त पेये प्यायला देतात. परंतु, प्रत्येक आरोग्यदायी वस्तू मुलांसाठी फायदेशीर असेल असे नाही. मुलांना पेय देण्यापूर्वी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

मुलांना पेय देण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

१. बाजारी पेयांचा मर्यादित वापर

उन्हाळ्यात मुलांच्या शरीरातील ग्लुकोजची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना ग्लुकॉन डी, रसना, टँग यांसारखे पेय पिण्यास देतो. पालक दिवसभर आपल्या मुलांना त्यांच्या आवडती पेयांची चव चाखण्यास देत असतात. परंतु असे केल्याने मुलांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढून शकते व मुले अकाली लठ्ठपणाची शिकार होऊ शकतात. तसेच त्यात असणाऱ्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे असे पेय मुलांना मर्यादित प्रमाणात प्यायला द्या.

२. कोल्ड ड्रिंक पासून दूर राहा -

उन्हाळ्यात लहानांपासून- मोठ्यांपर्यंत कोल्ड ड्रिंक अधिक पसंती मिळते. परंतु यात असलेले साखरेचे प्रमाण, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि उच्च कॅलरी मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी मुलांना कोल्ड ड्रिंक ऐवजी पाणी पिण्यास द्या. तसेच, मुलांना ज्यूस, ताक आणि नारळपाणी देऊ शकता.

३. साखरेचा कमी प्रमाणात वापर -

उन्हाळ्यात लिंबूपाणी, आंब्यांच्या रसाला अधिक पसंती मिळते. परंतु, लिंबूपाणीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असणे मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी कोणत्याही फळांचा (Fruit) रस बनवताना कमीत कमी साखर घालावी.

अशाप्रकारे तुम्ही काळजी घेऊन मुलांना हायड्रेड ठेवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

Gopinath Munde Legacy Controversy: धनंजयने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा,भुजबळांच्या वक्तव्यामुळे वादाचा भडका

SCROLL FOR NEXT